ट्रेन बंद पडल्यावर असणार 'बेस्ट' व्यवस्था, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची झाली तातडीने अंमलबजावणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते.

 'best' arrangement that will be in place after the train stops, the Chief Minister's order has been implemented immediately
ट्रेन बंद पडल्यावर असणार 'बेस्ट' व्यवस्था  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास पर्यायी बस व्यवस्थेचे नियोजन
 • अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहन 
 • महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आपत्कालीन व्यवस्थापन विषयक बैठक 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशिष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार हे मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, संबंधित खाते प्रमुख यांच्यासह बेस्ट उपक्रम, मध्य व पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) इत्यादी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. ( 'best' arrangement that will be in place after the train stops, the Chief Minister's order has been implemented immediately)

अधिक वाचा : ​Chanakya Niti: 'या' लोकांशी कधीही पत्करु नका शत्रूत्व

या बैठकी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीत झालेली चर्चा व देण्यात आलेले निर्देश या बाबत महत्त्वाची मुद्देनिहाय माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणेः- 

पावसाळ्यादरम्यान लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांबाबत
 

 1. पावसाळ्यादरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना योग्य ती मदत वेळच्यावेळी मिळावी, यादृष्टीने अधिक प्रभावी कार्यवाही करण्याच्या व त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली होती. या सुचनेनुसार अधिक परिपूर्ण नियोजन करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली. 
 2. लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशाप्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश. या अनुषंगाने ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ (SOPs) बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश.
 3. सदर संभाव्य प्रसंगी नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टची तयारी, तर ११ जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची माहिती.
 4. या अनुषंगाने सुसमन्वय साधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांच्या स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसारी समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली.
 5. लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश. 
 6. लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्यप्रकारे मिळावी, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश. 

अधिक वाचा : 299 रुपयांमध्ये पोस्टाकडून मिळणार १० लाखांचा विमा

पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर पडणारे खड्डे त्वरित भरण्याबाबत

 1. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे पडण्याची शक्यता असते. या खड्ड्यांबाबत विविध माध्यमातून व हेल्पलाईनच्याही माध्यमातून माहिती व तक्रारी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास प्राप्त होत असतात.
 2. वरीलनुसार प्राप्त झालेल्या खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देश. 
 3. पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ साहित्य वापरले जाते. तथापि, पावसाळ्यादरम्यान पाऊस नसण्याच्या दिवशी अन्य प्रकारचे साहित्य निर्धारित पद्धतीनुसार उपयोगात आणण्याचे निर्देश.
 4. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे व पाहणी दरम्यान आढळून आलेल्या खड्ड्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश.  

अति धोकादायक इमारतींबाबत

 1. अति धोकादायक इमारतींमध्ये (C1 Building) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश व त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मा. उप मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिली.
 2. वरील अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणा-या रहिवाशांनी सदर इमारत रिकामी करावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यकती कार्यवाही व कारवाई देखील नियमितपणे करण्यात येत आहे. 
 3. अति धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तात्पुरत्या निवा-यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश.
 4. एकंदरीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरी सेवा-सुविधांबाबत अधिकाधिक परिपूर्ण व अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राचे संबंधित मा. खासदार व मा. आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क  साधण्याचे निर्देश.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी