बेस्ट बसमध्ये तिकीट काढण्यासाठी आता वापरता येणार UPI अॅप

मुंबई
Updated Sep 16, 2020 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या कोरोनाच्या संकटाच्या काळात जगभरात एक मोठे युद्ध चालू आहे. यात शारीरिक अंतराचे नियमही महत्वाचे आहेत. याकाळात वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या मुंबईच्या बेस्ट बसमध्येही वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

BEST tickets can be bought from UPI app
बेस्ट बसमध्ये तिकीट काढण्यासाठी आता वापरता येणार UPI अॅप  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • प्रवासी आणि कंडक्टरच्या हातांचा येणारा संसर्ग टाळण्यासाठी सोय
  • कसे काढाल यूपीएने तिकीट?
  • बेस्ट आणि फोनपेच्या भागीदारीतून नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई: सध्या कोरोनाच्या संकटाच्या काळात जगभरात एक मोठे युद्ध (Worldwide war against spread of corona virus) चालू आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक पातळ्यांवर काम (India is working on various levels to stop Covid-19 infection) चालू आहे. यात शारीरिक अंतराचे नियमही महत्वाचे (rules about physical distancing are important) आहेत. याकाळात वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या मुंबईच्या बेस्ट बसमध्येही (BEST buses in Mumbai providing transportation in Mumbai in these difficult times) जास्तीत जास्त शारीरिक अंतराचे पालन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात (various initiatives for maintaining social distancing) येत आहेत. आता बेस्ट बसचे तिकीट काढण्यासाठी आपल्याला पैसे कंडक्टरच्या हातात देण्याची गरज (no need to give fare money in the hands of the conductors) नाही. आपल्याला हे पैसे यूपीआयच्या माध्यमातून देता येणार (facility to give the ticket fare through UP app) आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची बातमी (news given by Times of India) दिली आहे.

बेस्टने दिलेल्या माहितीनुसार बेस्टने फोनपे या अॅपशी भागीदारी केली असून याद्वारे यूपीआयद्वारे पैसे देण्याची सोय करण्यात आलेली आहे. या नव्या उपक्रमामुळे शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन चांगल्या प्रकारे करता येणार आहे.

कसे काढाल यूपीएने तिकीट?

यासाठी मुंबईतील १०,००० कंडक्टरांचा Unique QR code तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे प्रवासी यूपीआय वापरून पैसे देऊ शकतील. यासाठी प्रवाशांना फक्त तिकिटाची रक्कम विचारून आपल्या फोनवरील यूपीआय अॅपद्वारे याचा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. यानंतर तिकिटाची रक्कम आणि यूपीआयचा पिन क्रमांक घालून तिकिटाचे पैसे भरायचे आहेत. या नव्या पद्धतीमुळे प्रवाशांना तिकिटाची नेमकी रक्कम किंवा नेमके सुट्टे पैसे बाळगण्याची कटकट होणार नाही. आणि सध्याच्या या संकटाच्या काळात पैशांची देवाणघेवाण करताना प्रवासी आणि कंडक्टर यांचा एकमेकांच्या हातांशी येणारा संबंध आणि पर्यायाने कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका टाळता येईल.

बेस्ट आणि फोनपेच्या भागीदारीतून नव्या उपक्रमाची सुरुवात

बेस्टचे डेप्यूटी पीआरओ मनोज वरदे म्हणाले, “हा मार्ग प्रवासी आणि कंडक्टर अशा दोघांसाठी सोयीचा आहे. या नव्या उपक्रमामुळे मुंबईकरांना सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास सहाय्य करण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी आम्हाला आशा आहे.”

फोनपेचे उपाध्यक्ष विवेक लोहचेब यांनी सांगितले, “मुंबईतील प्रवाशांना शरीरसंपर्काविना पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बेस्टने आमच्याशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरील २७ बस अड्ड्यांतील ३,००० बसेसमध्ये क्यूआर कोड्स लावण्यात आले आहेत.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी