BEST कडून मुंबईकरांना गिफ्ट !, एप्रिलपासून शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशीही धावणार जादा बसेस

मुंबईमध्ये रविवारच्या दिवशी बेस्टच्या फक्त 60 टक्के बसेस धावतात, मात्र, बेस्ट आता वीकेंड आणि सुटीच्या दिवशी 80 टक्क्यांहून अधिक बसेस चालवण्याचा प्रयत्न करणार आहे

BEST to run 20 percent more buses on Saturdays, Sundays and holidays from April
BEST कडून मुंबईकरांना गिफ्ट !, एप्रिलपासून शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशीही धावणार जादा बसेस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर
  • वीकेंड आणि सुटीच्या दिवशी जादा बसेस धावणार
  • एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी

मुंबई :  मुंबईकरांच्या सोयीसाठी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (बेस्ट) ने रविवार आणि सुट्टीच्या दिवशी त्यांच्या बसेस चालवण्यासाठी नवीन पॅटर्न आणण्याचा निर्णय घेतला आहे.  सध्या फक्त 60 टक्के बसेस रविवारी धावतात. पण  बेस्ट आता वीकेंड आणि सुटीच्या दिवशी 80 टक्क्यांहून अधिक बसेस चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. (BEST to run 20 percent more buses on Saturdays, Sundays and holidays from April)

अधिक वाचा : महागाई भत्ता वाढला, पण सरकारी तिजोरीवर पडला बोजा

एप्रिलपासून नवीन पॅटर्न लागू

मुंबई लाईफलाईन म्हणून लोकल रेल्वेचा उल्लेक केला जातो. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सुरू करतात. त्यामुळे अनेक वेळा कोणत्याना कोणत्या मार्गावर मेगाब्लाॅक असतो. अशावेळी लोकल ट्रेन 40 टक्के क्षमतेने चालवल्या जातात. त्यामुळे मुंबईकरांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बेस्टच्या बसेस, टॅक्सी आणि रिक्षा यांची मदत घ्यावी लागते. पण सुट्टीच्या दिवशी बेस्टही बस पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत नाही. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे खूप हाल होतात.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, शहरातील सध्याच्या रहदारीच्या पद्धतीचे विश्लेषण केल्यानंतर, परिवहनने आमच्या बस ऑपरेशन्सचा रविवार आणि सुट्टीचा पॅटर्न पुन्हा डिझाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, बेस्ट शहरात दररोज 3,600 हून अधिक बस चालवते, ज्याचा वापर आठवड्याच्या दिवसात 35 लाखांहून अधिक प्रवासी करतात. दरम्यान, सध्या सुमारे 25,000 टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत, त्यापैकी सुमारे 40% रविवारी रस्त्यावरून जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी