BEST चा बेस्ट निर्णय: बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल; 3,675 कोटी रुपयांचा करार, 5 km प्रवासाला असेल 6 रुपये भाडे

मुंबई
भरत जाधव
Updated May 24, 2022 | 09:28 IST

मुंबई (Mumbai ) बेस्ट (Best Bus) बसच्या उपक्रमात आता एसी इलेक्ट्रिक बस (AC electric bus) दाखल होणार आहेत. BEST ने हैदराबादच्या (Hyderabad) ऑलेक्ट्रा ग्रीनटेक (olectra Greentech) या कंपनीला येत्या वर्षभरात 2,100 इलेक्ट्रिक बसेसचा (Electric buses) पुरवठा करण्यासाठी 3,675 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. ये

BEST's fleet will include 2100 electric buses
BEST's fleet will include 2100 electric buses  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बेस्टच्या ताफ्यात येत्या वर्षभरात या इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार
  • 12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा
  • या बसेस एका चार्जवर जवळपास 200 किमी धावू शकतात,

मुंबई : मुंबई (Mumbai ) बेस्ट (Best Bus) बसच्या उपक्रमात आता एसी इलेक्ट्रिक बस (AC electric bus) दाखल होणार आहेत. BEST ने हैदराबादच्या (Hyderabad) ऑलेक्ट्रा ग्रीनटेक (olectra Greentech) या कंपनीला येत्या वर्षभरात 2,100 इलेक्ट्रिक बसेसचा (Electric buses) पुरवठा करण्यासाठी 3,675 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. येत्या वर्षभरात या इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून याबाबत बेस्टकडून इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला पत्र देण्यात आले आहे. 12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. 

काय आहेत वैशिष्ट्ये?

अलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी ही करारानुसार 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे. या बसेस एका चार्जवर जवळपास 200 किमी धावू शकतात, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत सध्या Olectra कंपनीच्या 40 बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत. इव्हे आणि ऑलेक्ट्रा या कंपन्या राज्यातील परिवहन उपक्रमात या इलेक्ट्रिक बसेस चालवत आहेत. 

यामध्ये पुणे, अहमदाबाद, सिल्व्हासा, नागपूर, देहरादून, गोवा या शहरात या बसेस चालत आहेत. 12 मीटर लांबीच्या या बसमध्ये 35 बसलेले प्रवासी आणि 24 स्टँडी प्रवासी बसू शकतात. त्यांच्याकडे व्हीलचेअर प्रवेश, जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित ITMS, पॅनिक बटण आणि एअर सस्पेंशन आहे. सध्या, बेस्टच्या 3337 ताफ्यात 386 ई-बस आहेत. 2023-अखेर 50% इलेक्ट्रिक बस फ्लीटमध्ये 900 डबल-डेकरसह 2,000 अधिक ई-बस असण्याची योजना आहे. 2027 पर्यंत 100% इलेक्ट्रिक फ्लीट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

एसी ई-बस प्रवासासाठी 6 रुपये भाडे 

बेस्ट उपक्रमाने 12 महिन्यांच्या कालावधीत 2,100 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली असताना, अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 किमीसाठी एसी इलेक्ट्रिक बसच्या प्रवासासाठी 6 रुपये भाडे सध्या सुरू राहील. यापूर्वी, मुंबई शहराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली होती की, ऑगस्टपासून जवळपास 900 एसी डबल डेकर बसेस सुरू होतील.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी