Mumbai Crime : भजन गायकाकडून विद्यार्थीनीची छेडछाड, मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 29, 2023 | 16:13 IST

Crime news: मुंबईतील पश्चिम उपनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भजन गायकाने विद्यार्थ्याची छेड काढल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भजन गायकाची विद्यार्थीनीसोबत छेडछाड
  • मुंबईतील घटनेने सर्वत्र खळबळ
  • आरोपी भजन गायकाला जीआरपीने केली अटक

Bhajan Singer arrest by Police: मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या बोरीवली रेल्वे स्थानकात एका विद्यार्थीनीसोबत छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीला जीआरपीने कारवाई करत अटक केली आहे. आरोपीचे नाव दीपक पुजारी असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक पुजारी याने 19 वर्षीय पीडित मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीने त्याला विरोध केला आणि आरडा-ओरड केला. हे पाहून आरोपी दीपक याने ट्रेन पकडून पळ काढला.

हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा

मात्र, पीडित मुलीने तात्काळ या प्रकरणाची माहिती जीआरपी पोलिसांना दिली. त्यानतंर जीआरपी अधिकाऱ्यांनी आरोपीला पालघर जिल्ह्यातील विरार येथून अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोरीवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अनिल कदम यांनी सांगितले की, सर्वप्रथम आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पीडित विद्यार्थीनीसोबत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी तिला त्रास देऊ लागला. इतकेच नाही तर नंतर तो तिची छेड काढू लागला.

हे पण वाचा : असंख्य गुण असलेली शतावरी पुरुषांना देते जबरदस्त स्टॅमिना अन् पावर

आरोपीच्या त्रासाला कंटाळलेल्या या मुलीने अखेर आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी तेथून ट्रेन पकडून फरार झाला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो भजन गायक आहे आणि त्याने अनेक भजन अल्बमसाठी गाणी सुद्धा गायली आहेत. सध्या आरोपी हा पोलिसांच्या कोठडीत आहे.

हे पण वाचा : कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?

रेल्वे पोलिसांनी सांगितले की, पीडित विद्यार्थीनी परीक्षा देण्यासाठी जात होती आणि त्याचवेळी आरोपीने तिची छेड काढली. पीडित मुलीने आरडा-ओरड केल्यावर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

पोलिसांनी आरोपीला विरारमधून अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी