राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही, भाजपच्या 'या' नेत्याने केले स्पष्ट

bharatiay janta parti state president chandrakant patil big statement : मोहीत कंबोज हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत येथील हॉटेलमध्ये दिसला होता. यानंतर अनेकांनी गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र आहे. त्याचे सगळ्याच पक्षात चांगले मित्र आहेत. मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहित नसल्याचे पाटील म्हणाले.

bharatiay janta parti state president chandrakant patil big statement
'राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात होत असलेल्या उलथापालथीमागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केला होता.
  • मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र
  • मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही. – चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यामध्ये ज्या उलथापालथी होत आहेत, त्याचा आणि भाजपशी काहीही संबंध नसल्याची भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान, गेल्या ३ दिवसांपासून राज्यात उलथापालथ सुरु आहे. या उलथापालथीमागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, यावर चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकत याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची १३ जणांचा कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं.

अधिक वाचा : जुलैच्या सुरूवातीला बुध बदलणार चाल, या लोकांना होणार फायदा

मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र

दरम्यान, मोहीत कंबोज हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत येथील हॉटेलमध्ये दिसला होता. यानंतर अनेकांनी गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र आहे. त्याचे सगळ्याच पक्षात चांगले मित्र आहेत. मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहित नसल्याचे पाटील म्हणाले. असल्याचं पाटील म्हणाले. याचबरोबर पाटील यांनी शरद पवार आणि राऊत यांना देखील टोला लगावत म्हटलं की, शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

अधिक वाचा ; शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले... 

मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही. – चंद्रकांत पाटील

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यामध्ये ज्या उलाथापालथी सुरु आहेत. त्याबाबत आपल्यालाला काहीही माहित नाही. या गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे. मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही असंही पाटील म्हणाले. पण काहीतरी चाललय असेही पाटील म्हणाले. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे. गावोगावचे लोक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला येत आहेत. अपक्ष जे आमच्याबरोबर आहेत. त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आला असल्याचे पाटील म्हणाले.

अधिक वाचा : सतत लघवीला होत असल्यास करा हे प्रभावी घरगुती उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी