मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात ईडी( ED), सीबीआय (CBI) तपास यंत्रणांची कारवाई भाजपकडून (BJP) सुरू असते. मात्र भाजपच्याच नेत्यांची भ्रष्टाचाराची ( corruption) प्रकरणं दाबली जातात, असा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)नेहमी करण्यात येतो. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या घोटाळ्याचं प्रकरण समोर आणलं आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भलं मोठं पत्रही लिहिले आहे. (Bhima Cooperative Sugar Factory: 500 crore corruption charges against BJP MLA Rahul Kul; What is the matter? Why the accusations?)
अधिक वाचा : जास्त लिंबू पाणी पिणं आहे धोकेदायक
भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना मोठं पत्र लिहिले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिलाय. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
यासोबत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. या प्रकरणात सोमय्या मूग गिळून का बसलेत, असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊतांचे हे पत्र आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
अधिक वाचा : कोणी-कोणी पटकावला Oscar, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण पुण्यातील दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे.
दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला. ‘कारखान्यात 500 कोटी रुपयांचे मनी लँडरींग झाले आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असा इशारा या पत्रातून दिला आहे.
विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या भाजपातील भ्रष्टाचाराविरोधात का मूग गिळून बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. जनतेच्या पैशांची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, या अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
संजय राऊतांनी पत्रात मार्फत सर्वांसमोर आणलेल्या या भ्रष्टाचाराची चर्चा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. परंतु या आरोपांमागे अजून काही कारण आहे का?
संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्याविरोधातच हे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, यामागे एक मोठं कारण पुढे आलं आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली. राऊत यांना ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’ या वक्तव्यावरून लेखी खुलासा मागण्यात आला आहे.
अधिक वाचा : एकनाथ महाराजांना एकनाथषष्ठी निमित्त विनम्र अभिवादन
त्यांनी खुलासा केल्यानंतर राऊत यांच्यावर हक्कभंगासंबंधी काय कारवाई करायची, यासाठी हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. विधिमंडळातील या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल आहेत. संजय राऊत यांनी या कनेक्शनमधूनच राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सप्टेंबर महिन्यात राहुल कुल हे एका व्हिडिओतून चर्चेत आले होते. जेजुरीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढल्या होत्या. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. राहुल कुल हे पुण्यातल्या दौंड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यादेखील प्रभावी नेत्या आहेत.भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या आत्या आहेत.
अधिक वाचा :संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या एकनाथषष्ठीची काय आहे कथा
आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष हे 1990 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार आणि कुल कुटुंबाची जवळीक वाढली. 1999 मध्ये कुल यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारकी मिळवली. पण सुभाष कुल यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली.
2009 मध्ये राहुल कुल यांनाच पक्षाने संधी दिली. निवडणुकीत राष्ट्रवादीने बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कुल यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. तेव्हापासून ते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.