उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी! CM एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सचिव, प्रवक्ते आणि खजिनदारही बदलले

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना बुधवारी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केली होती. नवीन कार्यकारिणीत शिवसेनेचे सचिव, खजिनदार आणि प्रवक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Big blow to Uddhav Thackeray! CM Eknath Shinde also changed Shiv Sena's secretary, spokesperson and treasurer
उद्धव ठाकरेंना मोठा झटका! CM एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सचिव, प्रवक्ते आणि खजिनदारही बदलले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली
  • शिवसेनेचे खजिनदार, सचिव, प्रवक्ते बदलले
  • चिवपदी कामगार नेते किरण पावसकर, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची नियुक्ती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेच्या प्रवक्ते, खजिनदारपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Big blow to Uddhav Thackeray! CM Eknath Shinde also changed Shiv Sena's secretary, spokesperson and treasurer)

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे 55 पैकी 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याने हीच 'खरी शिवसेना' असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. या आमदारांनी शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीत पक्षाच्या प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची, तर रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. तर यशवंत जाधव, आ. गुलाबराव पाटील, आ. उदय सामंत, आ. तानाजी सावंत, विजय नाहाटा, माजी खा. शिवाजीराव आढाळराव पाटील, अभिनेते शरद पोंक्षे यांची उपनेतेपदी निवड झाली आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर लोकसभेतील गटनेतेपदावरुन खा. विनायक राऊत यांना हटवून खा. राहुल शेवाळे यांची तर मुख्य व्हिपरपदावरुन राजन विचारे यांच्या जागी भावना गवळी यांची निवड केली. त्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मंजूरी दिली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला शिंदे गटाने बुधवारी आणखी एक मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची नियुक्ती केली आहे. तर पूर्वी जाहीर केल्या आमदार दिपक केसरकर हेच शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते राहणार आहेत. पण, त्यांच्या मदतीला शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी