Bombay हायकोर्टाचा मोठा निर्णय !, तिसऱ्या मुलानंतरही उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र, पण..

bombay hc :तिसरे मुलं जन्माला आले. पण नॉमिनेशन डेटपूर्वी त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर कॅंडिडेट निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतो. त्याच्या उमेदवारीवर कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असा निकाल बाॅंबे हायकोर्टाने दिला आहे.

Big decision of high court !, Eligible to contest even after third son, but..
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !, तिसऱ्या मुलानंतरही निवडणूक लढवण्यास पात्र, पण.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तीन अपत्ये असलेल्या व्यक्तीही निवडणुकीच्या मैदानात उतरणार
  • मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • कोणीही त्याच्य उमेदवारीवर आक्षेप घेऊ शकत नाही.

मुंबई : महाराष्ट्र व्हिलेज पंचायत अॅक्टच्या संदर्भात आज बाॅबे हायकोर्टाने आपला निकाल दिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कट ऑफ डेटनंतर जन्माला आलेलं मुलं किंवा नॉमिनेशन दाखल करण्यापूर्वी तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर त्या उमेदवारांच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही. असा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतो, त्याच्या उमेदवारीवर कोणताही व्यक्ती प्रश्न उपस्थित करू शकत नाही. (Big decision of high court !, Eligible to contest even after third son, but..)

अधिक वाचा : OTT Web series Release This Week : शाहिद कपूर- काजोल ओटीटीवर करणार कमाल; या आठवड्यात प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट अन् वेबसीरिज

न्यायमूर्ती आर पेडणेकर यांनी प्रशासनाने दिलेला निर्णय बरखास्त केला. ज्यामध्ये एका महिलेला तीन अपत्येंमुळे डिस्क्वालिफाय केले होते. प्रशासनाचे म्हणण होते. कट ऑफ डेटनंतर महिलेने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. बाॅबे हाईकोर्टने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मुलं जन्माला आले होते. पण नामांकन भरण्याच्या तारखेपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. 

IND vs PAK : 12 फेब्रुवारीला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना; कुठे पाहता येणार Match

 सेक्शन 14(1)(j-i) सांगते की कोणत्याही व्यक्तीला दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्यास निवडणूक लढता येणार नाही. या खटल्यामध्ये याचिकाकर्ता महिला जानेवरी 2021 च्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण गावातील एका सदस्याने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने महिलेची निवड रद्द केली.  तक्रारदाराचे म्हणणे होते की, कट ऑफ डेट 9 सप्टेंबर 2001 होती. महिलेला जो तिसरे मुलं झाले. ते या तारखेनंतर जन्माला आल्याने ती निवडणूक लढविण्यास पात्र नाही. याचिकाकर्ता महिलेचे वकिल म्हणाले की, तिसऱ्या मुलाचा जन्म 12 फेब्रुवारी 2002 ला झाला होता. पण मॅच्युर नसल्याने 2 एप्रिल 2002 ला त्याचा मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी