Mumbai: शिंदे गटाकडून भाजपलाच खिंडार; 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics news: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला. मात्र, त्याच दरम्यान आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Big jolt for bjp in mumbai as more than 100 leaders join eknath shinde camp read in marathi
एकनाथ शिंदे गटाचा मोठा डाव, भाजपवर केला घाव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे गटाचा मोठा डाव, भाजपवर केला घाव
  • मुंबईतील 100हून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
  • आगामी मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का 

BJP activist join Shinde camp: एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील अनेक नेते हे शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देताना दिसून येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपला एक झटका बसला आहे. कारण, मुंबईतील 100 हून अधिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Big jolt for bjp in mumbai as more than 100 leaders join eknath shinde camp read in marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजप माजी वॉर्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासोबत 100 महिलाांनी शिंदे गटाला समर्थन देत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

हे पण वाचा : लग्नानंतर 'या' 10 गोष्टींमुळे मुलींचं आयुष्यच बदलतं​

बोरिवली मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेत्रृत्वात आणि उपस्थितीत या महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला. राज्यातील मनपा निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या आणि विजय मिळवण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. त्याच पद्धतीने आता शिंदे गटाने सुद्धा आपल्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा एक भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. याचा फटका आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेतून अनेक नेते, पदाधिकारी, नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करत असताना आता भाजपचे पदाधिकारी सुद्धा शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिंदे गटाची ताकद वाढतच चालली आहे. आता आगामी निवडणुकीत शिंदे गटाला या सर्वांचा किती फायदा होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी