मोठी बातमी! काँग्रेसला झटका; प्रवक्ते अरुण सावंत एकनाथ शिंदे गटात सहभागी

Maharashtra political news updates: राज्यात सत्तांतर झाल्यावर एकनाथ शिंदे गटाला मोठा पाठिंबा नेते, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. 

big jolt for congress in mumbai as spoksperson Arun Sawant join Eknath shinde camp with his supporters
मोठी बातमी! काँग्रेसला झटका; प्रवक्ते अरुण सावंत एकनाथ शिंदे गटात सहभागी 
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीतील आणखी एका पक्षाला एकनाथ शिंदेंचा झटका
  • काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

Jolt for Maharashtra Congress: एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिवसेनेतील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे गटाला मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसत असताना आता महाविकास आघाडीतील आणखी एका पक्षाला झटका बसला आहे. (big jolt for congress in mumbai as spokesperson Arun Sawant join Eknath shinde camp with his supporters)

महाविकास आघाडीतील शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. अरुण सावंत हे आपल्या समर्थकांसह आणि कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

अधिक वाचा : MLC निवडणुकीत ७ कोटींना एक मत? मिटकरींच्या दाव्याने खळबळ

अरुण सावंत हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यांनी मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक सुद्धा लढवली होती. पण याच अरुण सावंत यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अरुण सावंत यांनी काँग्रेस सोडल्याने त्याचा फटका येत्या मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बसण्याची दाट शक्यता आहे.

काँग्रेस पक्ष फुटीच्या वाटेवर? 

तीन दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्याने दावा केला होता की, महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस हे फुटीच्या मार्गावर आहेत. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं, मला वाटतं महाराष्ट्राचा विचार केला तर दोन्ही काँग्रेस पक्ष हे फुटीच्या मार्गावरच आहेत.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणात भाजप नेत्याने केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आजी-माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळेही चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत असं काही होणार नसल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी