Big News : शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात, या आमदाराचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेतील खासदार नाराज असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खासदारांनी ही नाराजी व्यक्त केली.

Big News 14 Shiv Sena MPs in touch with BJP,  MLA Prasad lad say to media
Big News : शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात? 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेतील खासदार नाराज असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
  • सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खासदारांनी ही नाराजी व्यक्त केली.
  • शिवसेनेतील हा अंतर्गत कलह समोर येत असतानाच, आता भाजप आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेतील खासदार नाराज असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खासदारांनी ही नाराजी व्यक्त केली. (Big News 14 Shiv Sena MPs in touch with BJP,  MLA Prasad lad say to media)
  
शिवसेनेतील हा अंतर्गत कलह समोर येत असतानाच, आता भाजप आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील जवळपास सर्वच खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक खुलासा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील जवळ जवळ सर्वच खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. 18 पैकी 13 ते 14 शिवसेना खासदार हे भाजपमधील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेतील सर्वच खासदार हे महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर नाराज आहेत. 


नरेंद्र मोदींशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही, हे या खासदारांना चांगलेच माहीत आहेत. त्यामुळे हे खासदार सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. 2024 च्या निवडणुकांवेळी हे खासदार भाजपमध्ये आलेले असतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी