Water Cut in Mumbai । मुंबईकरांनो लक्ष द्या,  27 आणि 28 जानेवारी रोजी 'या' भागात येणार नाही पाणी 

mumbai news in marathi । मुंबईकरांनो या बातमीकडे लक्ष द्या   मुंबईतील काही भागांत येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी (27 आणि 28 जानेवारी) पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.

big news for mumbai water supply of M Ward will be cut off on january 27 and 28 mumbai news in marathi
27 आणि 28 रोजी मुंबईत 'या' भागात नाही पाणी  
थोडं पण कामाचं
  • गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील (South Mumbai) काही भागात पाणी पुरवठा बंद
  • बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम  करायचे आहे
  •  येत्या  गुरुवारी (27 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून शुक्रवारी (28 जानेवारी)  पहाटे 4 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

Water cut । मुंबई :  गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील (South Mumbai) काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर आता   बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम  करायचे आहे. त्यामुळे येत्या  गुरुवारी (27 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून शुक्रवारी (28 जानेवारी)  पहाटे 4 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.  त्यामुळे या कालावधीत म्हणजे गुरुवारी (27 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून शुक्रवारी (28 जानेवारी) एम/पूर्व आणि एम/पश्चिम या विभागांमधील खालील परिसरात 18 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

अधिक वाचा : विरोधीपक्षाने नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली-संजय राऊत

कोणत्या भागात नाही येणार पाणी जाणून घ्या 

एम/पूर्व विभाग (M/East Ward)  : 

प्रभाग क्रमांक 140 - टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग; 
 
प्रभाग क्रमांक 141 - देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड; 
 
प्रभाग क्रमांक 142 - लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत; 
 
प्रभाग क्रमांक 143 - जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर;
 
प्रभाग क्रमांक 144 - देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग,  दूरसंचार कारखाना परिसर, 
मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत; 
 
प्रभाग क्रमांक 145 - सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा 
ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे; 
 
प्रभाग क्रमांक 146 - देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत - 

अधिक वाचा : टिपू सुलतान देशगौरव होऊ शकत नाही - फडणवीस

एम/पश्चिम विभाग :

प्रभाग क्रमांक 151 – साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर; 
 
प्रभाग क्रमांक 152 - सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर; 
 
प्रभाग क्रमांक 153 - घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क; 
 
प्रभाग क्रमांक 154 - चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; प्रभाग क्रमांक 155 - लाल डोंगर

त्यामुळे सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. 

तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी