Anil Deshmukh appeared in the ED office : परमबीर सिंह गायब होताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 01, 2021 | 13:35 IST

former Home Minister Anil  Deshmukh appeared in the ED office : परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी माजी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केले होते.

Big news! former Home Minister Anil Deshmukh finally appeared in the ED office
माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ईडीने वारंवार समन्स बजावून देशमुख ईडीसमोर हजर होत नव्हते.
  • अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप
  • नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील देशमुखांच्या घरी ईडीची छापेमारी

former Home Minister Anil  Deshmukh appeared in the ED office :  मुंबई : परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी माजी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

दरम्यान देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह मात्र गायब आहेत. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अनेक खंडणी उकाळण्याचे आरोप आले असून गुन्हे दाखल झाले आहेत. तर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुखांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. 

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतु ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांची बाजू ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.  

कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही -दरेकर 

कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. त्यामुळे लपण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला असेल, असंही प्रवीण दरेकर वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्याापासून परमबीर सिंहही न्यायालयात गैरहजर राहत आहेत. परमबीर सिंह यांच्यावर काही दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती दाखल केली होती. या समितीने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकवेळा नोटीस पाठवूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे ते इतर देशात पळून गेल्याची चर्चा आहे. परमबीर सिंह यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. परंतु अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले, असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी