Mhada Lottery । होळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी खुशखबर!, म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी लॉटरी

Mhada Lottery 2023 on Holi 2023 in Marathi : होळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबई परिसरात घराचं स्वप्न करण्याचा ठरवलं आहे. होळीच्या दिवशी म्हणजे सोमवारी 6 मार्चला 4 हजार 752 घरांसाठी जाहीर प्रसिद्ध होणार आहे. तर बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. तर 10 मे 2023 ला सोडत निघणार आहे. पाहा कसा करता येईल अर्ज

big news! MHADA will take out lottery of 4000 houses in Mumbai next month
Mhada Lottery । होळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी खुशखबर!, म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी लॉटरी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हाडाच्या साडेचार हजार घरांसाठी लॉटरी

Mhada Lottery 2023 on Holi 2023 in Marathi :  मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून साडेचार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ ८ मार्चपासून होणार आहे. यंदाच्या लॉटरीत प्रधानमंत्री आवास योजना, सर्वसमावेशक योजना आणि कोकण मंडळ योजनेचा समावेश आहे. मे महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार असून, घरांच्या किमती १३ लाख रुपयांपासून सुरू होत असून, घरांच्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. १३ लाखांपासून सुरू झालेल्या किमती २५ लाखांपर्यंत असणार आहेत. (big news! MHADA will take out lottery of 4000 houses in Mumbai next month)

अधिक वाचा : Mumbai : वंदे भारत सारखी चालणार वंदे लोकल

म्हाडाच्या या घरांसाठी १० एप्रिलपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. १२ एप्रिलपर्यंत अनामत रक्कम भरता येईल. २८ एप्रिलपर्यंत हरकती मांडता येतील. तर १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घरांची लॉटरी काढली जाईल. दरम्यान,  विखुरलेल्या घरांची लॉटरी काढली जाणार असून, त्याचे वेळापत्रक म्हाडाने स्वतंत्र काढले आहे. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत १४५६ घरांचा समावेश आहे. ही घरे ठाणे, पालघर, कल्याण, वसई, नवी मुंबई, सानपाडा आणि विरार येथे आहेत. म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेत घरे आणि भूखंडाचा समावेश आहे. रायगड, कल्याण, पेण, अंबरनाथ, बदलापूर, सिंधुदुर्गमध्ये घरे, भूखंड असून, त्याचा आकडा १६६ आहे. कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २०४८ विखुरलेली घरे विरार येथे आहेत. 

अधिक वाचा : Mumbai Railway Megablock : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आज या ठिकाणी मेगाब्लॉक

प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण घरे

कल्याण येथील  शिरढोण आणि खोणी, ठाणे येथील गोठेघर, विरार येथील बोळींज येथे ही घरे आहेत.

अधिक वाचा : Women's Day : महिलांना मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट

प्रधानमंत्री आवास योजना 

(कौटुंबिक उत्पन्न)
अत्यल्प उत्पन्न गट - ३ लाखांपर्यंत
उत्पन्न गट - उत्पन्न मर्यादा (मुंबई, पुणे, नागपूर, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था) / उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था) / चटई क्षेत्र
अत्यल्प गट - ६ लाख / ४ लाख ५० हजार / ३० चौमीटर
अल्प गट - ९ लाख / ७ लाख ५० हजार / ६० चौमीटर
मध्यम गट - १२ लाख / १२ लाख / १६० चौमीटर
उच्च गट - कमाल मर्यादा नाही / कमाल मर्यादा नाही / २०० चौमीटर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी