मोठी बातमी ! मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 03, 2023 | 09:03 IST

मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक( former-Corporator) संदीप देशपांडे (Sandip despande) यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क (shivaji park) येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. 

Big news! MNS leader Sandeep Deshpande attacked during morning walk
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत.
  • शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असताना देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला.
  • देशपांडे यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : मनसेचे नेते आणि  माजी नगरसेवक( former-Corporator) संदीप देशपांडे (Sandip despande) यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क (shivaji park) येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत.  (Big news! MNS leader Sandeep Deshpande attacked during morning walk )

अधिक वाचा  :  संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

देशपांडे यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन-तीन अज्ञातांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावली होती.

अधिक वाचा  :  मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

देशपांडे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना एकटे पाहून हल्लेखोरांनी स्टम्पच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे थोडक्यात बचावले असलेल्याचं सांगण्यात येत आहे. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर नेहमी मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढाला. देशपांडे यांच्या हाता पायाला मार लागला आहे.

अधिक वाचा  : रात्री झोपण्याआधी पाणी प्यायल्याने वारंवार वापरावे लागेल टॉयलेट

दरम्यान संदीप देशपांडे यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा  : हिरवा कांदा त्वचा चमकवेल आणि केसांना देईल नवी चमक

मनसे नेते संतोष धुरी म्हणाले, संदीप देशपांडेंवर भ्याड हल्ला आहे. मॉर्निंग वॉकवेळी हा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकवेळी संदीप देशपांडे यांना एकट्याला पाहून चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता.  हा पूर्वनियोजित कट होता. क्रिकेट स्टम्पने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.  संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी