SSC Result 2021: दहावीचा निकालाची अखेर तारीख ठरली; कसा पाहणार वेबसाईटवर तुमचा निकाल, जाणून घ्या

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 15, 2021 | 18:06 IST

SSC Result 2021: राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे.

 Big news! SSC result will be available tomorrow at 1 pm
मोठी बातमी! उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल.
 • शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता
 • मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार

मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.  

राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आले होते. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी केलेल्या घोषणेनुसार यावर्षीचे बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पदोन्नती देईल. महाराष्ट्र इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकन निकष ही 9 वीच्या वार्षिक परीक्षेत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांद्वारे मिळविलेल्या गुणांवर आधारित आहे. मागील वर्षी बोर्डाने 93.32  उत्तीर्ण टक्केवारी मिळविली होती, तर यंदा ते १०० टक्के असेल. एसएससी निकाल 2021 चेक करण्यासाठी वर शेअर केलेल्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

कुठे पाहणार दहावीचा निकाल?

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

कसा पाहाल एसएससीचा निकाल

 • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
 • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
 • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
 • त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
 • यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

काय आहे दहावीच्या निकालाचे सूत्र?

दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

 • विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
 • विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
 • विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी