Milind Narvekar: 'आता मिलिंद नार्वेकर...', दसऱ्याच्या आधी बसणार 'मातोश्री'ला मोठा हादरा?

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 01, 2022 | 18:11 IST

Milind Narvekar and Shinde Group: दसऱ्यापूर्वी किंवा दसऱ्याच्या दिवशी शिंदे गट उद्धव ठाकरेंचा ‘उजवा हात’ समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनाच फोडण्याची तयारी करत आहे.

Milind Narvekar: 'आता मिलिंद नार्वेकर...', दसऱ्याच्या आधी बसणार 'मातोश्री'ला मोठा हादरा?
'आता मिलिंद नार्वेकर...', दसऱ्याच्या आधी बसणार 'मातोश्री'ला मोठा हादरा?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेला प्रचंड मोठा हादरा बसण्याची शक्यता
  • उद्धव ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातील मिलिंद नार्वेकरही शिवसेना सोडणार का?
  • गुलाबराव पाटीला यांचा खळबळजनक दावा

Milind Narvekar: मुंबई: दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी शिवसेनेला (ShivSena) उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली असली तरी त्यांच्या अडचणी मात्र काही कमी होत नसल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण दसऱ्यापूर्वीच किंवा दसऱ्याच्या दिवशी शिंदे गट हा उद्धव ठाकरेंचा ‘उजवा हात’समजला जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना आपल्या गटात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील (GuLABRA9 यांनी मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात रुजू होणार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. (big preparations form shinde camp before dussehra gulabrao patils statement will go to milind narvekar shinde group)

महाराष्ट्रात पहिले सत्ता गमावणे आणि हळूहळू आपल्या पक्षाची वाताहात होत असल्याचे उद्धव ठाकरेंना पाहावं लागत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे. तरीही उद्धव यांनी विरोधकांवर बोचऱ्या शब्दात टीका ही सुरुच आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपविरोधात ते सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. दुसरीकडे, शिंदे गट या सगळ्यावर बोलण्याऐवजी उद्धव ठाकरेंचा गट सातत्याने फोडण्याचा प्रयत्न करत आहे.

अधिक वाचा: Shiv Sena: पेंग्विन सेना म्हणतात त्याचा मला अभिमान आहे: आदित्य ठाकरे

याचवेळी शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी असा एक दावा केला आहे आहे की, ज्यामुळे मातोश्रीला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याचे त्यांनी नुकतेच आपल्या एका भाषणात सांगितले. 

गुलाबराव पाटील यावेळी असं म्हणाले की, 'मिलिंद नार्वेकरही आपल्याकडे येत असल्याची चर्चा सुरू आहे.' यावेळी गुलाबराव पाटील असंही म्हणाले की, पुढच्या काळात उद्धव ठाकरेंकडे आता जे  15 आमदार आहेत त्यापैकी 5 आमदारही त्यांच्याकडे राहणार नाही. आता फक्त आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह येणं तेवढं बाकी आहे.

अधिक वाचा: Shiv Sena: मी आता मैदानात उतरलोय; काय होईल ते बघून घेऊ: चंद्रकांत खैरे

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

54 वर्षीय मिलिंग नार्वेकर हे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यानंतर त्यांना पक्षाच सचिव पद देण्यात आलं. यासोबतच ते उद्धव ठाकरे यांचे राजकीय सल्लागार असल्याचं देखील बोललं जात होतं. दरम्यान, जेव्हा शिंदेंसह आमदारांनी जेव्हा बंडखोरी केली होती तेव्हा नार्वेकर यांच्यावर बरेच आरोप करण्यत आले होते. मात्र, आता त्याच नार्वेकरांसाठी शिंदे गट पायघड्या घालत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणार का? हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.

थापाही ''मातोश्री' सोडून गेला

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दोन खासगी स्वीय सहाय्यकांनीही शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. नवरात्रीच्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी मोरेश्वर राजे आणि चंपा सिंग थापा यांचा सत्कार करून त्यांना आपल्या गटात सामील करून घेतले. हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक कर्मचारी होते. मात्र, या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या लोकांनी असं म्हटलं की, 'त्यांना यापूर्वीच मातोश्रीवरून बेदखल करण्यात आलं होते.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी