महिला गृहउद्योगाच्या नावाखाली महाघोटाळा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 28, 2022 | 17:54 IST

Big scam in the name of women's griha udyog industry : महिला गृहउद्योगाच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Big scam in the name of women's griha udyog industry
महिला गृहउद्योगाच्या नावाखाली महाघोटाळा 
थोडं पण कामाचं
  • महिला गृहउद्योगाच्या नावाखाली महाघोटाळा
  • आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करा
  • घोटाळ्याचा सूत्रधार अजित हिवरे

Big scam in the name of women's griha udyog industry : मुंबई : महिला गृहउद्योगाच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी. घोटाळ्याचा सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केली.

अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला. मसाले पॅकिंग मशीन , बटन तयार करणारी मशीन , आटा मशीन याची विक्री मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांत  कंपनीच्या शाखा उघडल्या. 

जिल्ह्याजिल्ह्यात महिला डेव्हलपमेंट ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला. प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५ हजार रु. दरम्यान ठेवण्यात आली. या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदी केल्या. नंतर कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता कंपनीचे पुणे कार्यालय बंद आहे. कंपनीचा मालक अजित हिवरे फरार आहे. 

व्यवसाय वाढीसाठी अकोला , बुलडाणासह अनेक जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, असे भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले. 

हजारो महिलांनी ११ हजार रु . भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी आपल्या गावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी , लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही आमदार संजय कुटे यांनी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी