"काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात..." म्हणत Chitra Wagh यांनी ट्विट केला 'तो' VIDEO

Chitra Wagh tweeted viral video: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना सवाल केला आहे. 

BJP Chitra Wagh tweeted video of congress leader with caption of kay nana tumhi pan jhadi kay dongar kay hotel
"काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात..." म्हणत Chitra Wagh यांनी ट्विट केला 'तो' VIDEO 
थोडं पण कामाचं
  • भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केला व्हिडिओ 
  • व्हायरल झालेला व्हिडिओ नाना पटोले यांचा? 
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

Viral Video shared by BJP leader Chitra Wagh: महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापल्यानंतर सत्तांतर सुद्धा झालं. त्याच दरम्यान आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवालही विचारला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नाना पटोले (Nana Patole) असल्याचा दावा करणअयात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरंच नाना पटोले यांचा आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. (BJP Chitra Wagh tweeted video of congress leader with a caption of kay nana tumhi pan jhadi kay dongar kay hotel)

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं...." असं म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस यांना ट्विट केलं आहे.

व्हायरल व्हिडिओत काय? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती हॉटेलमध्ये एका महिलेच्या गळ्यात हात टाकून बसलेला आहे. हा व्हिडिओ पाठीमागून शूट करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा दिसू शकत नाहीये. पण व्हिडिओत नाना पटोले यांनी त्याच रंगाचा टी शर्ट परिधान केल्याचे फोटोजही दाखवण्यात आले असून तो त्यांचा व्हिडिओच असल्याचं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा : राजकीयदृष्ट्या राहुल गांधी अनुत्पादक : स्मृती इराणी

चित्रा वाघ यांनी काय म्हटलं? 

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, माझ्याकडे तो व्हिडिओ आला. मला सुद्धा तो व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं. मी सुद्धा तो चेक केलं, बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यावर मी सुद्धा नानांनाच विचारलं की नेमका प्रकार काय आहे? पण अद्याप त्यांच्याकडून तरी काही प्रतिसाद आलेला नाहीये.

काय म्हणाले नाना पटोले? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, राजकारणातील पातळी खालावत आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल त्या बद्दलची प्रक्रिया सुरू आहे. आमचं लेगल सेल याबाबत कारवाई करेल. आम्हाला बदनाम केलं जात आहे. हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टाइम्स नाऊ मराठीने या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाहीये. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे त्याचं आम्ही केवळ वृत्तांकन करत आहोत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी