भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली, घेतला मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 06, 2019 | 17:43 IST

BJP meeting over: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. या बैठकीत विविध विषयांवर कोअर कमिटीच्या नेत्यांनी चर्चा केली. तसेच उद्या राज्यपालांची सुद्धा भेट घेणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं

bjp core committee meeting leader meet maharashtra governor sudhir mungantiwar chandrakant patil new state president politics news marathi
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

 • भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली
 • बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा
 • नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतही चर्चा
 • ३१ डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार
 • उद्या सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार

मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तेरा दिवस उलटले असले तरी राज्यात अद्यापही सत्ता स्थापनेवरुन राजकीय संघर्ष सुरु आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, कोणत्याहीक्षणी गोड बातमी येऊ शकते आणि राज्यात महायुतीचच सरकार येणार. उद्या चंद्रकांत पाटील आणि मी राज्यपालांची भेट घेणार आहोत असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 

उद्या राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय-मित्र पक्षांना जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा सन्मान व्हावा ही भाजपची भूमिका आहे आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत. महायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडणार आहे, याशिवाय दुसरा विचार आमचा असूच शकत नाही. सरकार फक्त महायुतीचंच येणार आहे. आम्ही उद्या राज्यपालांची भेट घेऊन सर्व माहिती देणार आहोत असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

सत्ता स्थापनेचा दावा उद्या नाही?

उद्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत केवळ राज्यपालांना माहिती देऊन चर्चा करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार नाहीत असं दिसत आहे. 

भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भातही भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे, शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजपचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने उभा राहणार असल्यांचंही सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

३१ डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष 

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या संघटनेचा विस्तार सर्वव्यापी व्हावा यासंदर्भात चर्चा झाली तसेच प्रदेशाध्यक्ष निवडीवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याचंही भाजपने स्पष्ट केलं आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं...

 1. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीच्या तारखेच्या संदर्भात चर्चा झाली
 2. प्रदेशाध्यक्ष निवडीवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा 
 3. ३१ डिसेंबरपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षची निवड होणार
 4. भाजपच्या संघटनेचा विस्तार सर्वव्यापी व्हावा यासंदर्भात चर्चा झाली
 5. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संवेदनशील पणे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे 
 6. शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजपचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने उभा राहणार
 7. शिवसेना-भाजप-आरपीआय-मित्र पक्षांना जनादेश मिळाला आहे
 8. या जनादेशाचा सन्मान व्हावा ही भाजपची भूमिका आहे आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत
 9. महायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडणार 
 10. याशिवाय दुसरा विचार आमचा असूच शकत नाही 
 11. उद्या सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार
 12. कोणत्याहीक्षणी गोड बातमी येऊ शकते
 13. सरकार महायुतीचचं येणार
 14. सरकार फक्त महायुतीचंच येणार 
 15. या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम्ही उद्या राज्यपलांना भेटणार आणि चर्चा करणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी