BMC Election 2022 : महानगरपालिका निवडणुकीत भाजप मनसेची युती होणार का? बैठकीत झाला निर्णय

महाराष्ट्रात लवकरच मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्यसंस्थांची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत भाजप मनसे युती होणार का अशी चर्चा सुरू होती. त्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती, त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला होता.

devendra fadnavis and raj thackeray
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • लवकरच मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्यसंस्थांची निवडणूक होऊ घातली आहे.
  • निवडणूकीत भाजप मनसे युती होणार का अशी चर्चा सुरू होती.
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती,

BMC Election 2022 : मुंबई : लवकरच मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्यसंस्थांची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत भाजप मनसे युती होणार का अशी चर्चा सुरू होती. त्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती, त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला होता. परंतु आज भाजपची महानगरपालिका निवडणुकीवर बैठक पार पाडली आणि या बैठकीत अखेरचा निर्णय झाला आहे. 

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. मनसेसोबत युती न करू नये असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईत आणि इतर महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता आणा असे आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजप रिबप्लिकन आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र घेणार आणि मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगणार असे धोरण या बैठकीत ठरले आहे. 

आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान सागरमध्ये भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पाडली. या बैठकीत फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवायची आहे त्यासाठी तयारीला लागा असे फडणवीस म्हणाले आहेत. मनसेसोबत कुठलीही युती होणार नाही यावरून सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशची निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मनसेची जनमानसांत प्रतिमा ही उत्तर भारतीय विरोधी राहिली आहे. मनसेने सुरूवातीच्या काळात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांना विरोध  केला होता. अशा वेळी मनसेसोबत युती किंवा त्याबात चर्चा केल्यास भाजपला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसू शकते म्हणूनच ही युती झाली नाही असे सांगण्यात येत आहे. सध्या मनसेसोबत कुठलीही युती होणार नाही, त्यावर चर्चा होणार नाही, भाजप मुंबई आणि इतर महानगरपालिकांमध्ये स्वबळावर लढणार आहे असे फडणवीस यांनी आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. 


धोका न पत्करण्याचे धोरण

भाजपने महानगरपालिका निवडणूकीत जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी कुठलाही धोका न पत्करण्याचे धोरण ठरवलेले आहे. भाजपची रामदास आठवलेंच्या रिपाईसोबत युती आहे. तसेच महानगरपालिका निवडणूकीत छोट्या मोठ्या पक्षांशी युती करायची पण त्या पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती. म्हणून आता मित्रपक्षांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा भाजपचा मानस आहे. 


भाजपची मुसंडी

२०१४ साली निवडणुकीनंतर भाजप आणि सेनेची युती झाली होती. परंतु २०१७ च्या महानगरपालिकेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. तेव्हा शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. स्वबळावर लढून शिवसेनेच्या केवळ ९ जागा वाढल्या होत्या. तर भाजपच्या २०१२ च्या तुलनेत ५१ जागा वाढल्या होत्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी