भांडुपच्या दुर्घटनेचे १२ बळी, भाजपची ठाकरे सरकारवर टीका

वाढत्या कोरोना संकटामुळे मुंबई मनपाने भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये सनराईज हॉस्पिटलला तात्पुरते कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलमधील १२ जणांचा मृत्यू

bjp criticised thackeray government over bhandup fire incident
भांडुपच्या दुर्घटनेचे १२ बळी 

थोडं पण कामाचं

  • भांडुपच्या दुर्घटनेचे १२ बळी
  • भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेत १० बाळांचा मृत्यू
  • एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही; भाजपची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः वाढत्या कोरोना संकटामुळे मुंबई मनपाने भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये सनराईज हॉस्पिटलला तात्पुरते कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अडचणीत सापडले. भांडुपच्या दुर्घटनेत हॉस्पिटलमधील १२ जणांचा मृत्यू झाला आणि पाचजण गंभीर जखमी झाले. याआधी भंडारा जिल्ह्यात हॉस्पिटलला लागलेल्या आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला. यावरुन भाजपने ठाकरे सरकरवर टीका केली. (bjp criticised thackeray government over bhandup fire incident)

भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर राज्य शासनाने सर्व हॉस्पिटलमधील अग्नीसुरक्षा यंत्रणेचे पाहणी करण्याचे आदेश दिले होते. पण तात्पुरत्या कोविड सेंटरमधील अग्नीसुरक्षेची तपासणी करण्याबाबत कोणतीही सूचना दिली नव्हती. ताज्या घटनेत भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये सनराईज हॉस्पिटल तात्पुरत्या कोविड सेंटरचे वाताहात झाली. दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आणि पाचजण गंभीर जखमी झाले. 

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही घटनेचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला. 

भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर भांडुपमध्येही हॉस्पिटलला आग लागली. या दोन घटनांवरुन भाजपने राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. 'भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले... ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं'; अशा शब्दात भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली.

राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी लागू

मुंबई मनपाचे स्पष्टीकरण

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश दिले होते. सनराईज हॉस्पिटलने ३१ मार्च २०२१ पर्यंत कोविड सेंटर बंद करणार असल्याचे मनपा प्रशासनाला सांगितले होते. पण त्याआधीच आग लागली आणि मॉलसह कोविड सेंटरचे प्रचंड नुकसान झाले. या प्रकरणात आग लागण्याची कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाकडून कोणतीही हलगर्जी झाली की नाही याचीही पडताळणी सुरू आहे. मात्र प्रथमदर्शनी मॉलच्या आगीत कोविड सेंटरचे नुकसान झाल्याचे आढळल्याची माहिती मुंबई मनपाने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी