Sharad Pawar: भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, नितीश कुमारांनी टाकलेलं पाऊल अत्यंत शहाणपणाचं: शरद पवार

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 10, 2022 | 15:49 IST

Sharad Pawar Reaction on nitish Kumar: नितीश कुमार यांनी उचलेलं पाऊल अतिशय शहाणपणाचं आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.

bjp is gradually eliminate allies nitish kumars step is very shrewdness said sharad pawar
'भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो', शरद पवारांची खोचक टीका   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांची भाजपवर जोरदार टीका
  • भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, पवारांचा आरोप
  • शरद पवारांनी केलं नितीश कुमारांचं कौतुक

Sharad Pawar on BJP: मुंबई: एकीकडे भाजपने (BJP) महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली असताना दुसरीकडे मात्र त्यांना बिहारमध्ये (Bihar) नितीश कुमारांच्या (Nitish Kumar) भूमिकेमुळे सत्ता गमवावी लागली आहे. नितीश कुमारांच्या याच खेळीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, कौतुक केलं आहे. भाजप हा आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. त्यामुळे नितीश कुमारांनी आता टाकलेलं पाऊल हे अत्यंत शहाणपणाचं आहे. अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. (bjp is gradually eliminate allies nitish kumars step is very shrewdness said sharad pawar)

पाहा शरद पवार नेमकं काय-काय म्हणाले: 

'भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवून टाकतो'

'भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी कुठे तरी एक भाषण केलं त्यात त्यांनी स्वच्छ सांगितलं आहे की, जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांना भवितव्य नाही ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, जी नितीश कुमारांची तक्रार आहे की, भाजप त्यांच्या बरोबर असणारे जे मित्रपक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात.' अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

अधिक वाचा: 'भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली', मोदींचा गौप्यस्फोट

'भाजपने शिवसेनेत फूट पाडून त्यांना दुबळं केलं'

'याचं उदाहरण म्हणजे पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंह बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास त्यांनी संपुष्टात आणला. आज महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेची अवस्था त्यांच्यात फूट पाडून दुबळी कशी करता येईल यासंबंधीची आखणी ही भाजपने केली. ज्याला एकनाथ शिंदे आणि इतरांची मदत झाली.' असंही शरद पवार म्हणाले. 

'नितीश कुमारांनी टाकलेलं पाऊल हे अत्यंत शहाणपणाचं'

'यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्र पक्षाने केला आहे. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होतं. आज नितीश कुमार हे लोकांमध्ये मान्यता असलेलं नेतृत्व आहे. मागच्या निवडणुकीत नितीश कुमार आणि भाजप एकत्र लढले . भाजपची एक निती आहे की, ते निवडणुकीच्या वेळी एकत्र येतात आणि मित्र पक्षाचे लोकं कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडलं.'

अधिक वाचा: शिंदे गटातील या आमदारांना मंत्रिपद देण्यास भाजपचा होता विरोध

'तेच चित्र बिहारमध्ये दिसायला लागलं. म्हणून बिहारचे मुख्यमंत्री हे वेळीच सावध झाले आणि त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबाबत काही टीका-टिप्पणी करतील पण नितीश कुमारांनी टाकलेलं पाऊल हे अत्यंत शहाणपणाचं आहे. उद्याच्याला जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहेत त्याची नोंद वेळीच घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. एका दृष्टीने त्यांनी त्यांच्या राज्याच्या, पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला.' असं म्हणत शरद पवार यांनी नितीश कुमारांनी भाजपच्या साथ सोडण्याच्या निर्णयाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या आमदाराला मिळालं मोठं गिफ्ट

'एकनाथ शिंदेंनी स्वत:चा वेगळा पक्ष काढावा'

'धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या, तेव्हापासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अससेल्या. एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरुर स्वत:चा पक्ष काढू शकतात. आता माझे आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले तेव्हा मी राष्ट्रवादी हा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह घड्याळ घेतलं. आम्ही काही त्यांचं चिन्ह मागितलं नाही. त्यातला वाद वाढवला नाही. पण काही ना काही करुन वाद वाढविण्याची भूमिका कुणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाही.' असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी