BJP IT cell Tampers with Sharad Pawar's photos: BJP आय टी सेलकडून फोटोंशी छेडछाड; फर्जीवाडाच्या आधारे सत्ता घेणार का? फोटो ट्विट करत मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 27, 2021 | 16:38 IST

BJP IT cell tampers with Sharad Pawar's photo: राज्यातील भाजप (BJP) नेत्यांची दिल्लीवारी होऊ लागली आहे. या दिल्लीवारीमुळे राज्यातील राजकारणात काही उलथापालथ होणार की काय, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या

Nawab Malik
BJP आय टी सेलकडून शरद पवारांच्या फोटोशी छेडछाड (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिका यांनी शरद पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटोशॉप केलेला फोटो केला ट्विट.
  • भाजप आयटी सेल कडून फोटोंशी छेडछाड केली जात असल्याचा आरोप
  • मार्चपर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं होतं.

BJP IT cell tampers with Sharad Pawar's photo: मुंबई : राज्यातील भाजप (BJP) नेत्यांची दिल्लीवारी होऊ लागली आहे. या दिल्लीवारीमुळे राज्यातील राजकारणात काही उलथापालथ होणार की काय, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यात मार्चपर्यंत राज्यात भाजपचं सरकार येणार असं विधान भाजप नेते केंद्रीय मंत्री (BJP leader Union Minister) नारायण राणेंनी  (Narayan Rane) केल्याने राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले जाऊ लागले. परंतु नारायण राणेंनी केलेला दावा किती फोल आणि फुसका असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP spokesperson) आणि अल्पसंख्याक विकास मंत्री (Minority Development Minister ) नवाब मलिक (Nawab Malik)  म्हणाले आहेत. नवाब मलिका यांनी शरद पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटोशॉप केलेला फोटो ट्विट (Tweet) करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भाजपचे आयटी सेल फोटोंशी छेडछाड करत खोटे दावे केले जात आहेत, असं मलिक म्हणाले आहेत. नवाब मलिक यांनी भाजपच्या आयटी सेलने फोटोशॉप केलेला फोटो आणि एक ऑरिजनल फोटो शेअर करत भाजपचा फर्जीवाडा सर्वांसमोर आणला आहे. आपल्या ट्विटमध्ये मलिक म्हणाले आहेत की, भाजपच्या आयटी सेलचा हा आहे फर्जीवाडा, काय याच फर्जीवाड्याच्या आधारे केंद्रीय मंत्री मार्च महिन्यात सरकार बनविण्याचा दावा करत आहेत का? असा सवाल केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून भाजपकडून खोटा प्रचार करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. 

दरम्यान, गुरुवारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर काल शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारी केली. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान केले होते की, मार्च महिन्यापर्यंत राज्यात भाजपचं सरकार येणार. त्यावर सत्ताधारी नेत्यांकडून योग्य प्रकारे उत्तरही देण्यात आले आहे. 

राज्यात होणाऱ्या महानगरापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपने हालचाली सुरू केल्या. अनेक गोष्टींची पडताळणी केली जात आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यांच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तर चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली वारी करत अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितले. तर, राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी