Ashish Shelar threatened: भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 08, 2022 | 12:58 IST

BJP leader Ashish Shelar threatened : भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही (Family) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) पत्राद्वारे तक्रार दिली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती.

BJP leader Ashish Shelar
भाजप नेते आशिष शेलार यांना जिवे मारण्याची धमकी (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भाजप नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
  • आशिष शेलार यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
  • आशिष शेलार यांना 2020 मध्येही धमकी मिळाली होती.

 Ashish Shelar threatened :  मुंबई: भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही (Family) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) पत्राद्वारे तक्रार दिली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यात कारवाई करून पोलिसांनी आरोपीला मुंब्रा (Mumbra) येथून एकाला अटक केली होती.
भाजपचे नेते आशिष शेलार यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना अज्ञात व्यक्तीचे

दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन आले. शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकारानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. ज्या मोबाइल क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती, त्या दोन्ही क्रमांकांची माहिती देऊन याचा तपास करावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार आहे. 

दरम्यान, याआधीही आशिष शेलार यांना 2020 मध्येच अशाच प्रकारे धमकी मिळाली होती. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात मुंब्रा येथून आरोपीला अटक केली होती. तर, यापूर्वी शेलार आणि अन्य दोन व्यक्तींची रेकी केल्याचे समोर आले होते. आता दहशतवाद्यांकडून नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच दरम्यान आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून आमदार आशीष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना डिसेंबर महिन्यात धमकीचे पत्र आले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी