Ashish Shelar : मुंबईच्या सौंदर्यावर खादाड वाघ नख मारतोय, भाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

बिल्डरांच्या फायद्यासाठी शिवसेना मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू बिल्डरांच्या घशात घालत आहे असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत घोटाळे वाढत असून मुंबईच्या सौंदर्यावर खादाड वाघ नख मारतोय असेही शेलार म्हणाले.

ashish shelar
आशिष शेलार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिल्डरांच्या फायद्यासाठी शिवसेना मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू बिल्डरांच्या घशात घालत आहे
  • मुंबई महानगरपालिकेत घोटाळे वाढत असून मुंबईच्या सौंदर्यावर खादाड वाघ नख मारतोय
  • मुंबई महानगर पालिकेच्या घोटाळ्यांची मालिका वाढत आहे

Ashish Shelar : मुंबई : बिल्डरांच्या फायद्यासाठी शिवसेना मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू बिल्डरांच्या घशात घालत आहे असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत घोटाळे वाढत असून मुंबईच्या सौंदर्यावर खादाड वाघ नख मारतोय असेही शेलार म्हणाले.

शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेद म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या घोटाळ्यांची मालिका वाढत असून ऐकावे ते नवलच या पध्दतीने घोटाळयांची प्रकरणे रोज समोर येत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. जे नवीन प्रकरण समोर आले आहे ते भयंकर आहे. मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली जागा, स्थळे, आणि इमारती आहेत. यातील काही ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती पुरातत्व विभागाकडून संरक्षीत केली जातात कारण या ऐतहासिक वास्तुंमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडते.  नवीन घोटाळा जमोर आला आहे ज्यामध्ये मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुध्दा हेरिटेज श्रेणी ३ मधील वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगीवीना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे असे शेलार म्हणाले.

तसेच  जगभरात हेरिटेज स्ट्रक्चर वाचविण्यासाठी प्रयत्न होत असतना शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेत ही स्ट्रक्चर तोडण्याच्या परवानग्या बिल्डरांना जलदगतीने दिल्या जात आहेत. मुंबईत श्रेणी ३ मध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर आणि १३ परिसरांमध्ये तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तीन परस्पर दिली असून ही कुणाच्या सांगण्यावरुन दिली? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणा-या या वास्तू तोडण्याची परवागनी दिली जातेय याकडे पर्यटन मंत्र्यांचे लक्ष आहे का?  मुंबई आमचीच असा कांगावा करणारे आता या विरोधात का बोलत नाहीत ? असा सवालही शेलार यांनी विचारला आहे.  यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत असा आरोप करत मुंबईच्या सौंद्यावर खादाड वाघ नख मारतोय अशी टीकाही शेलार यांनी केली.

हे महाभंयकर आहे, या विषयात मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, आयुक्तांना कायद्याची आठवण करुन देतोय अन्यथा मुबईच्या सौंदर्यात भर घालणा-या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी