"... तर तुमचे लवंडे कसे वागले असते" Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल

Ashish Shelar PC: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेतून आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

BJP leader ashish shelar takes dig on uddhav thackeray after he criticise cm eknath shinde
भाजप नेते आशिष शेलार (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा संपूर्ण राज्याचा अपमान - आशिष शेलार
  • सुप्रिया सुळे आता काही बोलणार का?, आशिष शेलारांचा सवाल
  • 'ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्ब्यात जातो'

 Ashish Shelar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून त्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. (BJP leader ashish shelar takes a dig on uddhav Thackeray after he criticise cm eknath shinde)

"भाजपमुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व"

आशिष शेलार म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे... उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात हे भाजपमुळे आहे. भाजपबद्दल बोलणे, भाजपला इशारा देणे, टोमणे मारणे असं केलं तरच कुठे महाराष्ट्रात त्यांना स्थान उरेल अशी स्थिती आहे. म्हणून ही वाईट सवय खोड त्यांची सहजासहजी जाणार नाही. अन्यथा आम्ही प्रतिक्रिया दिलीही नसती.

अधिक वाचा : भाजपला शिवसेना संपवायची आहे -उद्धव ठाकरे

हा महाराष्ट्रद्रोह होत नाही का? 

आशिष शेलार पुढे म्हणाले, पण एका गोष्टीचा उल्लेख जरूर करतो, या गोष्टीचं विश्लेषण पत्रकारांनीही केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा म्हणत असेल तर महाराष्ट्राला हे बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घालून-पाडून अपमानित पद्धतीने बोलणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. आता सुप्रिया सुळे यावर काही बोलतील का? हा महाराष्ट्रद्रोह होत नाही का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

आज आम्ही असं वागणार नाही पण...

त्यामुळे उद्धवजी तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात तसे आम्ही वागणार नाही. तुम्ही सत्तेत मुख्यमंत्री असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडण करत होतात. जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन तुम्ही त्यांचे डोळे फोडले होते. जे मीडियाचे पत्रकार असो किंवा संपादक असो सरकारी धोरणाविरोधात बोलेल त्याला घरातून मुसक्या बांधून तुम्ही अटक केली आहे. आज आम्ही असं वागणार नाहीत. पण, तुम्ही जर आज असता आणि तुम्ही जो उल्लेख सामनाच्या मुलाखतीत केला तसा उल्लेख तुमचा चुकून कुणी केला असता तर तुमचे जे काही लवंडे आहेत आणि तुमचे कार्यकर्ते, तुम्ही कसे वागला असता याचा जरा विचार करा असंही आशिष शेलार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी