Chandrakant Patil : संजय राऊत जगातले विद्वान व्यक्ती, त्यांनी गोव्यातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवावी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे आव्हान

Chandrakant Patil भाजपने मनोहर पर्रिकरांच्या सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना दिलेली वागणूक चुकीची आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर राऊत यांनी स्वतः गोव्यात निवडणूक लढवावी असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिले आहे

chandrakant patil
चंद्रकात पाटील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राऊत यांनी स्वतः गोव्यात निवडणूक लढवावी
  • उत्पल्ल पर्रिकरांना तिकीट दिल्यास सर्व विरोधक ही निवडणूक बिनविरोध करणार का ?
  • शिवसेनेने फसवून सरकार स्थापन केले आहे

Chandrakant Patil Goa Election : मुंबई : भाजपने (BJP) मनोहर पर्रिकरांच्या (manoharparrikar) सुपुत्र उत्पल पर्रिकर (utpal parrikar) यांना दिलेली वागणूक चुकीची आहे अशी टीका शिवसेना खासदार (shivsena mp) संजय राऊत (sanjay raut) यांनी केली होती. त्यावर राऊत यांनी स्वतः गोव्यात निवडणूक लढवावी (contest goa election) असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष (bjp maharashtra state president) चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी दिले आहे. तसेच उत्पल्ल पर्रिकरांना तिकीट दिल्यास सर्व विरोधक ही निवडणूक बिनविरोध करणार का असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेने फसवून सरकार स्थापन केले आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वांना एकत्र घेऊन काम करत नाही यावर आमचा आक्षेप आहे. संजय राऊत हे जगातील विद्वान व्यक्ती आहेत. राऊत यांनी गोव्यात एखादा  मतदारसंघ निवडून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी. पंतप्रधान मोदी गुजरातमधून उठतात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवतात आणि जिंकतात, राऊत फक्त भाषण करतात असे पाटील म्हणाले. तसेच मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचे की नाही यावरून अद्याप निर्णय झालेल नाही, तरी उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकीट दिले तरी सर्वपक्षीय ठरवून ती निवडणूक बिनविरोध करणार का असा सवाल पाटील यांनी विचारला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी