Chitra Wagh : मुंबई : मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्वीन प्रेम आज जगजाहीर झालं अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केली. वाघ म्हणाल्या, की पेडणेकर स्वत: ५५० किमी प्रवास करून गुजरातमधील अहमदाबादच्या पेंग्वीनच्या भेटीला गेल्या, परंतु वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात हेही त्यांनी स्वताचं जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच असे वाघ म्हणाल्या.
मुंबईच्या महापौरताईंचं पेंग्वीन प्रेम आज जगजाहीर झालं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची शिवसेनेवर टीका#chitrawagh #kishoripednekar #penguine pic.twitter.com/CbKFNXlQ8z — Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 31, 2022
पेडणेकर यांना गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची प्रशंसा केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीत अशा प्रकारे पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते. परंतु आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे.आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्वीनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते. शिवसेनेलाअ मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवरती त्यांना काही देणं घेणं नाही असेही वाघ म्हणाल्या.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.