'लाज वाटली पाहिजे', ६ वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी चित्रा वाघ यांची सरकारवर टीका 

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 06, 2020 | 12:12 IST

Goregaon (Mumbai) Rape: मुंबईतील गोरेगाव येथे एका ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Chitra Wagh
'लाज वाटली पाहिजे', ६ वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी चित्रा वाघ यांची सरकारवर टीका   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील गोरेगावमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
  • बलात्कारप्रकरणी ३० वर्षीय आरोपीला अटक
  • बल्ताकार प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

मुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या घटनेसंदर्भात देशभरात निदर्शने होत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वच स्तरातून मागणी होत आहे. जेणेकरून देशात अशा घटना रोखता येतील. मात्र, अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्या तरीही अशा प्रकारच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. देशातील वेगवेगळ्या राज्यात महिला आणि मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काल (सोमवार) मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथे एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (6 year old girl Rape case)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 

दरम्यान, याप्रकरणी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'लाज वाटली पाहिजे. रोज मोकाट हरामखोरांकडनं महिलामुलींच्या अब्रूचे लचके तोडले जाताहेत महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्याहेत का? उत्तर द्या' असा थेट सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी भाजप नेते सरकारला धारेवर धरत आहेत. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईच्या गोरेगाव भागातील आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ज्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सद्यस्थितीत आरोपीविषयी अधिक कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्रच आहे. जो त्यांच्या घरी नेहमी येत-जात असे. याच व्यक्तीने मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जेव्हा चिमुकलीवर अत्याचार करत होता तेव्हाच तिचा मोठा भाऊ हा घरी पोहचला. समोरचं दृश्य पाहून त्याने आरडाओरड केला आणि शेजाऱ्यांना बोलावलं. तसंच याबाबत आपल्या आई-वडिलांना देखील माहिती दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी