Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांचा उल्लेख मराठी राबडी देवी, भाजप नेत्याने ट्विट केल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात, चौकशी सुरू

Rashmi  Thackeray रश्मी ठाकरे यांचा उल्लेख मराठी राबडी देवी केल्याने भाजप नेते जितेन गजारिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा फोटो ट्विट करून मराठीत राबडी देवी असा उल्लेख केला होता.

jiten gajaria
जितेन गजारिया  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • श्मी ठाकरे यांचा उल्लेख मराठी राबडी देवी
  • भाजप नेते जितेन गजारिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
  • अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही

Rashmi  Thackeray : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या पत्नी आणि दै. सामनाच्या (saamana) संपादक रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांचा उल्लेख मराठी राबडी देवी (rabri devi) केल्याने भाजप नेते (bjp leader) जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा फोटो ट्विट (tweet) करून मराठीत राबडी देवी असा उल्लेख केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या (mumbai police) सायबर शाखेने (cyber crime) त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. 

काही महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि दैनंदिन कामकाजात सक्रिय नव्हते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही ते गैरहजर होते. त्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे सत्तेची सुत्रे येतील अशी चर्चा सुरू होई. या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी रोजी भाजप नेते जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आणि त्यावर मराठी राबडी देवी असे कॅप्शन दिले होते. 

पोलिसांनी याबद्दल दखल घेत गजरिया यांना ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू केली आहे. जितेन गजरिया यांचे वकील आणि भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी गजेरिया यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. गजरिया यांना पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गजारिया यांनी पोलीस स्थानकात हजेरी लावली आणि गेल्या एक तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचेही गुप्ता यांनी नमूद केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी