किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, 'या' माजी मंत्र्यावर 300 कोटींचा घोटाळ्याचा आरोप

Kirit Somaiya Active: गेले अनेक दिवस शांत असलेले किरीट सोमय्या हे आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पुन्हा एकदा आवाज उठवताना दिसत आहेत. मात्र, यावेळी शिवसेना नेत्यांच्या नव्हे तर काँग्रेसच्या माजी मंत्र्यावर त्यांनी आरोप केले आहेत.

bjp leader kirit somaiya active again somaiya has accused congress former minister aslam shaikh of 300 crores scam
किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, 'या' माजी मंत्र्यावर आरोप  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह
  • माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावर 300 कोटींचा घोटाळ्याचा आरोप
  • शिंदे सरकार आल्यानंतर सोमय्यांनी काँग्रेसमधील मंत्र्यांवर साधला निशाणा

Kirit Somaiya: मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) काळात सातत्याने टीका करणारे आणि भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून मागील काही दिवस शांत असल्याचे दिसून येत होते. मात्र, नवीन सरकारच्या काळात किरीट सोमय्या पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. आज (३० जुलै) त्यांनी मुंबई उपनगरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर तब्बल 300 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. (bjp leader kirit somaiya active again somaiya has accused congress former minister aslam shaikh of 300 crores scam)

पत्रकार परिषद घेत याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, 'महाविकास आघाडी हे लुटारू सरकार होते. त्यातील आता आणखी एका मंत्र्यांचा 300 कोटींचा घोटाळा आज मी मांडणार आहे. गेल्या २ वर्षात काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. यातील ५ स्टुडिओ हे सी.आर. झेड झोनमध्ये आहेत.'

अधिक वाचा: जे राऊत करु शकले नाही ते किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने 'करुन दाखवलं'

'२०१९ ला ही जागा हिरवीगार होती. मात्र, २०२१ मध्ये हा परिसर सी. आर. झेडमध्ये नाही असे पर्यटन विकास मंडळाने म्हटले आहे.' असेही सोमय्यांनी सांगितले.

'कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवण्यात आली आहे. मात्र खारफुटीच्या झाडांची कत्तल करुन येथे स्टुडिओ उभारण्यात आले आहेत.' असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

अधिक वाचा: सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटातील यामिनी जाधव, सरनाईकांवरील ईडीची पीडा टळणार?

सोमय्यांच्या दाव्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे १० लाख स्केअर फूटची जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले. भाटीया स्टुडिओची ३ एकर जागा कागदावर दिसते, परंतु खरे बघितले तर अधिकची २ एकर जागा वापरून फिल्म सेट ऐवजी फिल्म स्टुडिओ बांधकाम केले. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बाजूच्या प्लॉटला भेट दिली होती.

शिंदे सरकारकडून कागदपत्र मिळाल्याची कबुली:

किरीट सोमय्या यावेळी असंही म्हणाले की, 'शिंदे सरकार आल्यानंतर काही पेपर मिळाले ते आधी मिळत नव्हते, अशी जाहीर कबुली दिली. ते म्हणाले, होमवर्क करायला वेळ लागतो. पण आता शिंदे सरकार आले म्हणून काही पेपर मिळाले ते आधी मिळत नव्हते.' 

अधिक वाचा: राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा, किरीट सोमय्यांचा शिवसेनेला इशारा

'आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचविण्याचे काम करायचे. पण आता शिंदे-फडणवीस सरकार घोटाळेबाजांसाठी काम करत नाही. माझे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, दोघांकडून आश्वासन मिळाले आहे. लवकरच चौकशी होईल. तसेच यासंदर्भात कोस्टल रोड विभागालाही पत्र पाठवणार आहे.' असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

मागील अडीच वर्षात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, भावना गवळी, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रान उठवलं होतं. मात्र, सत्तांतर झाल्यापासून यापैकी काही लोकांवर सोमय्यांनी फारसं भाष्य केलेलं नाही. असं असताना आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी