Kirit Somaiya on shivsena : मुंबई : कोविड हा ठाकरे सरकर आणि शिवसेनेचे कमाईचे साधन आहे, म्हणूनच लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. दहिसरमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले, एक जानेवारीपासून ५०० बेड्सची ऑर्डर देण्यात आली आहे, त्यावर एकही रुग्ण दाखल नाही. या बेड्समध्ये आणखी ७५० बेड्स वाढवण्यात आले परंतु त्यात एकही रुग्ण दाखल नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. (bjp leader Kirit Somaiya criticized shivsena over covid center contract and corruption )
ठाकरे सरकार गांजाच्या प्रेमात आहेत, महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनावरील टीका एवढी का लागली ? किशोरी पेडणेकर यांचे पुत्र साईप्रसाद पेडणेकर यांना वरळीतील कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले आहे, नियमांचे उल्लंघन करून हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या कंत्राटाच्या माध्यमातून पेडणेकर यांच्या मुलाला आर्थिक लाभ झाला आहे, या कंपनीची स्थापना खुद्द किशोरी पेडणेकर यांनी केली आहे, असेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. मुंबईतल्या सहा कोविड सेंटरचे फॉरेन्सिक ऑडिट करावे असे आव्हान सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेल्या एका व्यक्तीला कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले त्याचे कागदपत्र आपण पुढच्या आठवड्यात जनतेसमोर आणणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मुंबईतील सहा कोविड सेंटरचे कंत्राट अपारदर्शकपणे देण्यात आले आहेत. आज जरी मुंबईत २० हजार कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी १८ हजार रुग्णांना कुठलीच लक्षणे नाहीत, ही बाब लोकांना सांगितले जात नाही, कारण लोकांना घाबरवण्यात येत आहे आणि भितीच्या माध्यमातून कमाई केली जात आहे असेही सोमय्या म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.