Nitin Gadkari : राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा

शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या शिवतीर्थावर मनसेचा मेळावा पार पाडला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये योगी उत्तम काम करत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून दोघांमध्ये २० मिनिटे चर्चाही झाली आहे.

gadkari and raj
राज ठाकरे, नितीन गडकरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
  • गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून दोघांमध्ये २० मिनिटे चर्चाही झाली आहे.
  • आता भाजप मनसेची युती होणार का या चर्चेला उधाण आले आहे. 

Nitin Gadkari : मुंबई : शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या शिवतीर्थावर मनसेचा मेळावा पार पाडला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये योगी उत्तम काम करत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून दोघांमध्ये २० मिनिटे चर्चाही झाली आहे. आता भाजप मनसेची युती होणार का या चर्चेला उधाण आले आहे. 

२०१४ पासून भाजप मनसेची युती होणार का यावर चर्चा होत आहे. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने शक्य झाले नाही. आता २०२२ ची मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत युती होणार का यावरही चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट घेतली होती. तेव्हा राजकीय वर्तुळात भाजप मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. परंतु उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मनसे युती होणार नाही असे स्पष्ट केले आणि या चर्चेला पूर्णविराम दिला. आता उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक पार पाडली असून भाजप मनसेची युती होणार का अशी चर्चा सुरू आहे. 

गुढीपाडव्याच्या मेळाव्या झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली अशी टीका विरोधी पक्षांनी केली. तसेच राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनीही स्वागत केले आहे. आज नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली असली तरी याबाबत दोन्ही नेत्यांनी काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

चर्चा होऊ शकते

कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, त्यामुळे आगामी चर्चा होऊ शकते अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचे भाजपकडून स्वागत आहे. भाजप हिंदुत्वाची भूमिका घेऊन देशभर लढत आहे आणि काम करत आहे. राज ठाकरे सारख्या मोठ्या नेत्याने हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने नितीन गडकरी यांना आनंद झाला आहे. याबद्दल भविष्यात नक्की चर्चा होऊ शकते असे दरेकर म्हणाले. तसेच गडरी आणि राज हे चांगले मित्र आहेत. यापूर्वीही त्यांची भेट झाली आहे आजही गडकरी राज यांची भेट घ्यायला गेले आहेत असेही दरेकर यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी