Pravin darekar comment : अकलेचं राजकारण आलं फॉर्मात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 15, 2022 | 16:50 IST

BJP leader Pravin darekar comment on recent political happening and cooperative bank election : 'महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात अकलेचं राजकारण आलं फॉर्मात' असं चित्र सध्या दिसत आहे.

Pravin darekar
अकलेचं राजकारण आलं फॉर्मात 
थोडं पण कामाचं
  • Pravin darekar comment : अकलेचं राजकारण आलं फॉर्मात
  • अजित पवारांच्या वक्तव्यावर आणि शिवसनेच्या राजकीय डावपेचांवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
  • कोणाची अक्कल किती हे पुन्हा एकदा दिसले - दरेकर

BJP leader Pravin darekar comment on recent political happening and cooperative bank election : मुंबई : 'महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात अकलेचं राजकारण आलं फॉर्मात' असं चित्र सध्या दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी संस्था चालवायला अक्कल लागते अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ताजी प्रतिक्रिया दरेकरांची आहे. या तीन नेत्यांच्या वक्त्यांनंतर कोणत्या पक्षाची आणि कोणत्या नेत्याची अक्कल किती यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे समर्थकांनी वर्चस्व निर्माण केले. संचालक मंडळावर राणेंचे अकरा समर्थक निवडून आले. यानंतर राणेंचे समर्थक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले. महाविकास आघाडी सरकारचे समर्थक असलेल्यांचा पराभव झाला. यानंतर मुंबै सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नऊ जण संचालक मंडळावर निवडले गेले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका मताने पराभूत झालेल्या भाजपने उपाध्यक्ष पद राखले. पण या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यापैकी कोणतेही पद मिळवणे जमले नाही. या घडामोडींचा संदर्भ देत भाजपने महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना संपविण्याचा उद्योग सुरू असल्याचे जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणाची अक्कल किती दिसून आले. यानंतर मुंबै बँकेच्या निमित्ताने शिवसेनेने अक्कलहुशारीने युती केल्याचे सांगितले. पण त्यांच्या पक्षाच्या मुंबै बँकेवरील संचालकांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यापैकी कोणतेही पद मिळवणे जमले नाही. यावरुन कोणाची अक्कल किती हे पुन्हा एकदा दिसले अशा स्वरुपाचे वक्तव्य दरेकर यांनी केले. 

नेमकं काय म्हणारे दरेकर?

सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरत आहे. लोकशाहीने विरोधी पक्षाला प्रश्न विचारायचा संविधानिक अधिकार दिला आहे. ज्या विषयावर प्रश्न विचारायचे थांबतील किंवा प्रश्नांवर विरोधी पक्षाच्याच प्रश्न चिन्ह निर्माण होईल अक्कल काढली जाईल त्या वेळेला संविधानाला अर्थ राहणार नाही. प्रश्न विचारल्या नंतर उत्तरं द्यायला अक्कल चालवावी लागते. उत्तरं द्यायला अक्कल चालवता येऊ नये म्हणून  अकलेचे तारे वेगवेगळ्या स्तरावर उपमुख्य मंत्री आणि मुख्यमंत्री छेडण्याच काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी