मुंबई : मुंबै सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रविण दरेकर यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे मुंबै सहकारी बँकेचे उपाध्यक्ष झाले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध झाली. । मुंबै बँक
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी राजीनामा दिला. यामुळे सहा महिन्यांच्या आतच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या आज (शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२) झालेल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया नव्याने पार पडली. या प्रक्रियेत प्रविण दरेकर बिनविरोध अध्यक्ष झाले तर माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे हे बँकेचे उपाध्यक्ष झाले.
प्रविण दरेकर अनेक वर्षांपासून मुंबै सहकारी बँकेवर वर्चस्व राखून आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने दरेकर यांना धक्का दिला होता. मजूर प्रवर्गातून १९९७ पासून निवडणूक लढविणाऱ्या दरेकर यांची पुन्हा एकदा संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. ते मजूर आणि नागरी बँक या दोन प्रवर्गातून निवडून आले होते. पण आयत्यावेळी आम आदमी पक्षाच्या धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात तक्रार केली.
सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. यानंतर प्रसाद लाड यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते आणि प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली. यामुळे सिद्धार्थ कांबळे अध्यक्ष झाले होते. पण आता चित्र बदलले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.