Raj Thackeray : भाजप नेते शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी दिल्या सूचना, वाचा सविस्तर

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेचा मेळावा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप-मनसे युती होणार का या चर्चा रंगल्या होत्या. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर भेट घेतली. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचनाही दिल्या.

raj and raosheb danave
राज ठाकरे रावसाहेब दानवे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर भेट घेतली.
  • यावेळी भाजपचे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते.
  • यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचनाही दिल्या.

Raj Thackeray : मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेचा मेळावा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप-मनसे युती होणार का या चर्चा रंगल्या होत्या. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर भेट घेतली. यावेळी भाजपचे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचनाही दिल्या.

आज भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या निवावसस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसीही उपस्थित होत्या. मनसेने याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. काही महत्वाचे रेल्वे प्रकल्प तसंच रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य आदी महत्वाच्या विषयांबाबतही राज ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. असे असले तरी आता भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. 

पुण्यात मनसेचा कार्यकर्ता मेळावा झाला होता. तेव्हा झालेल्या भाषणात हा फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर मुंबईत गुढीपाडव्याला असेल असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार गुढीपाडव्याला दादरच्या शिवाजी महाराज पार्कात मनसेचा मेळावा पार पाडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेची भाजपसोबत युती झाली असताना शिवसेने दगा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली असा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जातीयवाद वाढला, शरद पवार यांना जातीयवादाचे राजकारण हवे असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्यातील मदरशांची एकदा तपासणी करा आणि मशीदीवरील भोंगे हटवा अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपर आणि कांदिवलीत मशीदीसमोर हनुमान चालीसा लावली होती. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. 

सभे नंतर दुसर्‍या दिवशी केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हा भाजप मनसे युती होणार का या चर्चांना उधाण आले होते. परंतु राज ठाकरे आणि आपली भेट ही वैयक्तिक होती आणि या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी