शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर भाजपची महाजनादेश यात्रा

मुंबई
Updated Jul 21, 2019 | 16:48 IST

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेसह भाजपनं निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना भाजपही आता यात्रा काढणार आहे.

Bjp War room
शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर भाजपची महाजनादेश यात्रा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेनंतर भाजपची महाजनादेश यात्रा
  • मुख्यमंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी काढणार यात्रा
  • १ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत चालणार ही यात्रा

मुंबईः लोकसभा निवडणूक २०१९ नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्वंच पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर दोन्ही पक्षानं आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसण्याचं सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसह भाजपनं तयारी सुरू केली आहे. एकीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रा करत आहेत. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी महाजनादेश यात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाजपकडून सध्या संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून तयारी सुरू आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाजनादेश यात्रा काढणार आहेत. भाजपची ही महाजनादेश यात्रा येत्या १ ऑगस्ट सुरू होईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान ही यात्रा चालणार आहे. या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात जनतेशी संवाद साधणार आहेत. 

या यात्रेतून मुख्यमंत्री राज्यातल्या वेगवेगळ्या भागात भेटीगाठी करतील. तसंच सरकारानं राज्यभरात राबवलेल्या योजनांची माहिती देखील देतील. याव्यतिरिक्त या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची ही भेट यावेळी मुख्यमंत्री घेणार आहेत. या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील असतील. 

दुसरीकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुंबईत आहेत. शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा 

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गेल्या १८ जुलैपासून सुरूवात करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या टप्प्यात १८ ते २२ या पाच दिवसात आदित्य ठाकरे  जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यात यात्रा काढणार आहेत. आज २१ जुलै रोजी आदित्य ठाकरे नाशिकच्या ग्रामीण भागात आणि नगरमध्ये जनतेशी संवाद साधतील. तसंच या यात्रेत आदित्य ठाकरे जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

शिवसेनेनं केलेल्या कामांच्या तसंच शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी काल नाशिकमध्ये बोलून दाखवला. १९९५ मध्ये नाशकात शिवसेनेचं अधिवेशन झालं. त्यावेळी शिवसेनेचं सरकार आलं, म्हणूनच आज त्यासाठी नाशिकला आलो असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचं कौतुक देखील केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक नेहमी जनतेच्या सेवेसाठी हजर असतात, त्यांची काम करतात, त्यांना मदत करतात म्हणून आज मला खूप प्रेम मिळत आहे.  शिवसैनिकांचा जोश आणि जल्लोषच महाराष्ट्र भगवा करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर भाजपची महाजनादेश यात्रा Description: लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेसह भाजपनं निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना भाजपही आता यात्रा काढणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे 
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे