Narayan Rane: 'उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा, कपटी माणूस', नारायण राणेंची जहरी टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 26, 2022 | 23:37 IST

Narayan Rane Target Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर नारायण राणे यांनी तात्काळ राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठवली. पाहा यावेळी नारायण राणे काय-काय म्हणाले.

bjp minister narayan rane criticized shiv sena chief uddhav thackeray after his interview
'उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा, कपटी माणूस', राणेंची जहरी टीका  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर नारायण राणेंनी तात्काळ घेतली पत्रकार परिषद
  • नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
  • मुख्यमंत्रीपद गेल्याने उद्धव ठाकरे व्याकूळ, नारायण राणेंचा आरोप

नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'सामना' या शिवसेनेच्या (Shiv Sena) मुखपत्राने विशेष मुलाखत प्रसिद्ध केली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक गंभीर आरोप केले. ज्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज (26 जुलै) दिल्लीत तात्काळ पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली. (bjp minister narayan rane criticized shiv sena chief uddhav thackeray after his interview )

'उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्ष होतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे आणि दृष्ट बुद्धी आहे.' अशी जहरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

अधिक वाचा: भाजपला शिवसेना संपवायची आहे -उद्धव ठाकरे

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:

'उद्धव ठाकरे कपटी, दृष्ट बुद्धीचे'

'उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्ष होतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे आणि दृष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचं ना शिवसैनिकांचे कोणतीही काम केलेलं नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य. आता सांगताना या मुलाखतीमध्ये मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं मी शुद्धीवर नव्हतो. त्याचवेळेला सरकार पाडलं गद्दारांनी. असं ते म्हणतायेत.' 

'शिवसैनिक होते ते निवडून आले सत्ता आली मग जेव्हा उद्धव ठाकरेंशी जमलं नाही. पक्षपात करायला लागले. त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करुन शिवसेनेच्याच नावावर ते बाहेर आणि सत्तेत गेले.' असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'स्वत:चं पद एकनाथ शिंदेंना मिळाल्याचं पोटशूळ'

'पण दुसरीकडे स्वत:चं पद एकनाथ शिंदेंना मिळाल्याचं पोटशूळ. यातूनच ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली. संजय राऊतने आणखी एक काम हातात घेतलं ते पूर्ण करायला लागले. पहिलं काम त्यांनी केलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन खाली उतरवलं. आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे.'

अधिक वाचा: शिंदे गटाला, MIM किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याचा पर्याय

'संजय राऊत मनातून खुश आहे. मी फत्ते झालो, विजयी ठरलो. माझ्या गुरुने पवार साहेबांनी दिलेलं काम मी उत्तमरित्या पार पाडलं.' 

'उद्धव ठाकरे या मुलाखतीत वारंवार म्हणतात माझी माणसं विश्वासघातकी ठरली. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांनंतर कोणता शिवसैनिकाला विश्वास दिलात. राज्यातील कोणत्या आमदार-खासदाराला तुम्ही अडचणीत असताना मदत केली? मातोश्री बाहेरच्या एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली आहेत का?' असा सवालही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

अधिक वाचा: शिंदेंची हाव संपत नाही, शिवसेना गिळायला निघालेत -उद्धव ठाकरे

'एकनाथ शिंदेंना मारायला देखील सुपारी दिली होती'

'मी आज पेपरात वाचलं. एकनाथ शिंदेंना मारायला देखील सुपारी दिली होती नक्षलवाद्यांना. हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठ्या केलेल्या कार्यक्षम माणसं मोठी व्हायला लागली त्यावेळी एकेकाला कमी करण्याचं काम केलं यांनी.' 

'रमेश मोरे याची हत्या कोणी केली, जयंतराव जाधव.. ठाण्याचा एक नगरसेवक त्याची हत्या कोणी केली? नारायण राणेने शिवसेना सोडली तेव्हा कोणाकोणाला सुपाऱ्या दिल्या. देशाबाहेरच्या गँगस्टरला दिल्या. मी नाही बोललो तेव्हा. मी समर्थ होतो तोंड द्यायला. मी वाचलो ते माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईने.' 

अधिक वाचा: काँग्रेसला झटका; प्रवक्ते अरुण सावंत एकनाथ शिंदे गटात सहभागी

'यांनी तोंड उघडू नये. ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोलले आहेत. की, असं-असं काम मिळालं आहे. आम्ही नाही तर दुसरे करतील.' असे गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

'उद्धव ठाकरे एक नंबरचा नाटकी माणूस'

'उद्धव ठाकरे काय चेहरा सोज्वळ वैगरे.. मी असा.. तसा.. वर्षांतून बाहेर पडताना काय-काय नाटकं केली.. एक नंबरचा नाटकी माणूस. महाराष्ट्र प्रशासनाच्या कोणत्या योजना राज्यच्या जनतेसाठी वापरल्या यांनी? काही न करता कवढी बडबड करतो.'

'काय दिवे लावले तू.. एकदा छाती पकडतो, एकदा कंबर पकडतो.. एकदा पायाची ढोपरं पकडतो. हे दुखतंय.. अरे दुखत होतं तर झाला का मुख्यमंत्री? त्यामुळे हा सगळा खोटारडेपणा आहे सांगतोय तो. मुख्यमंत्री म्हणून खाली उतरल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात अश्रू आले नाहीत.' अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी