Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांची शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका 

भाजपा आमदार नितेश राणे यांनी  शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीका करणारे आणखी एक पत्र लिहीले आहे. यावेळी हे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे.

BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena once again
भाजप आमदार नितेश राणे यांची शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका  
थोडं पण कामाचं
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहीले पत्र 
  • मुंबईकरांवर अन्याय करणा-या विकासकांवर कारवाई करावी 
  • पत्राद्वारे नितेश राणे यांनी केली मागणी 

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी  शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीका करणारे आणखी एक पत्र लिहीले आहे. यावेळी हे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे. एसआरए प्रकल्पातील विकासकांच्या अन्यायामुळे मराठी माणूस नाइलाजास्तोवर मुंबई बाहेर जात आहे. आणि हे विकासक आदित्यसेनेचे असल्याचा आरोप राणे यांनी या पत्रात केला आहे.   (BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena once again)

अधिक वाचा : मातोश्रींवरुन शिवसैनिकांनी दिला आदेश


नितेश राणे यांनी पत्रात काय म्हटलं

एसआरएचे भाडेकरू आणि झोपडपट्टीधारक पुनर्विकास नियमांअतंर्गत खासगी विकासकांची नेमणूक करतात. त्यानुसार हे विकासक एक ते दीड वर्षाचे भाडे देण्याचा मान्य करतात. मात्र हे विकास प्रकल्प रखडतात आणे संबंधित विकासक भाडे देणे बंद करतात. त्यामुळे मुंबईतील भाडेकरूंना नाइलाजास्तव मुंबई सोडावी लागत आहे. असं या पत्रात म्हटलं आहे. 

अधिक वाचा : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला कोर्टाकडून परवानगी

कोविडमुळे मराठी माणसाची रोजीरोटी गेली आहे. तर दुसरीकडे मराठी माणूस आपल्या जीवनातील सहा सहा तास वसई विरार प्रवासात वाया घालवत आहे. विकासक राहती घर अडवून धरत आहेत. आणि भाडे न मिळाल्यामुळे ज्या घरात मराठी माणसं राहत आहे त्यांची घरातून हकालपट्टी होत आहे. तर काही ठिकाणी इमारती तयार असूनही ताबा मिळत नाही आणि योग्य ते भाडेही मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव मराठी कुटुंब आपलं घर विकासकाला किंवा एजंटला कमी दरात विकत देतो.

मराठी माणसांवर अन्याय करणा-या अशा विकासकांवर कठोर कारवाई करावी आणि मराठी मणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अधिक वाचा : आदित्य ठाकरेच्या आंदोलनापूर्वी भाजपने विचारले पाच प्रश्न 

बुधवारी झालेल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची आणि मुंबईकरांना मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. असे म्हंटले होते. पण मनपा निवडणुका आल्यामुळे अशाप्रकारच्या वल्गना होत आहे. आणि मुंबईकरांना मुंबई पासून शिवसेनेचे विकासकच तोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी