Poonam Mahajan : माझ्या बापालारे मारणारे मास्टरमाईंड कोण हे तत्कालीन सरकार शोधू शकले नाही, पूनम महाजन यांची काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका

Poonam Mahajan : माझ्या बापाला मारणारे कोण होते हे मला माहित आहे परंतु त्यांचे मास्टरमाईंड कोण हे तत्कालीन सरकार शोधून शकले नाही. अशी टीका भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. तसेच राजकारणातले शकूनी कोण हे ही जनतेला माहित आहे असेही महाजन म्हणाल्या.

poonam mahajan
पूनम महाजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माझ्या बापाला मारणारे कोण होते हे मला माहित आहे
  • परंतु त्यांचे मास्टरमाईंड कोण हे तत्कालीन सरकार शोधून शकले नाही
  • अशी टीका भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.

Poonam Mahajan : मुंबई : माझ्या बापाला मारणारे कोण होते हे मला माहित आहे परंतु त्यांचे मास्टरमाईंड कोण हे तत्कालीन सरकार शोधून शकले नाही अशी टीका भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. तसेच राजकारणातले शकूनी कोण हे ही जनतेला माहित आहे असेही महाजन म्हणाल्या. (bjp mp poonam mahajan criticized congress and ncp over pramod mahajan murder in 2005)

अधिक वाचा :  Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच

भाजप नेते प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांच्या राहत्या घरी २००५ साली हत्या केली होती.  त्यानंतर आरोपी प्रवीण महाजन यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. प्रवीण महाज यांचा नंतर ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला होता. परंतु प्रमोद महाजनांच्या खुनाचा मुद्दा पुन्हा वर आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून टीका केली होती. तेव्हा अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर टीका करत तुझ्या चुलत्याने तुझ्या बापाला का मारले, दोघेही एकाच आईचे पुत्र होते, तरी एका भावाने दुसर्‍या भावाला का मारले असा सवाल केला होता. आता मुंबई महानगरपलिकेच्या निवडणुकीपूर्वी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

अधिक वाचा : Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय

भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली असून प्रचारसभा घेण्यास सुरूवात केली आहे. काल वांद्रे येथे भाजपची प्रचारसभा पार पडली. तेव्हा खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, माझ्या बापाला कोणी मारले हे मला माहित आहे. हा प्रश्न प्रत्येकवेळी निर्माण करून फरक पडत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना माझ्या वडिलांची हत्या झाली परंतु सत्ताधारी पक्षाने त्यामागील मास्टरमाईंड कोण होते याचा शोध घेतला नाही. युतीत महाभारत घडलं, परंतु या महाभारतात शकुनी कोण होते हे सगळ्यांनाच माहित आहे. युतीमध्ये महाभारत घडवून शकुनींनी आपले महाभारत रचले असेही महाजन म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी