Pankaja Munde Corona Positive : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण

Pankaja Munde Corona Positive भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली
  • मुंडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

Pankaja Munde Corona Positive : मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव (BJP National President) आणि माजी मंत्री (Ex Minister) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. काही कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी \कोरोना चाचणी  (corona test) केली होती.  पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून (Twitter) ही माहिती दिली आहे. (bjp national secretary and ex minister pankaja munde corona positive   )


कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपण विलग झाले होते. पण कोरोना चाचणी केली तेव्हा मुंडे यांना कोरोनाची लक्षण आढळली आणि कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.  


सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना झाली होती लागण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली होती. जे जे आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करावी तसेच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले होते. 

राज्यातील २० आमदारांना कोरोनाची लागण

नुकतेच महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पाडले. या अधिवेशनानंतर १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचे शाहीविवाह सोहळे

राजकीय नेत्यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळा रंगला. यात मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत,माजी खासदार प्रफुल्ल पटेल,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह रजपूत, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश होता. यातील बहुतांश लग्नांना राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहिले. 

अनेक नेत्यांवर उपचार सुरु


महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी