भाजपचं संकल्पपत्र प्रसिद्ध, पुढील पाच वर्षांत १ कोटी रोजगार देणार, पाहा आणखी काय आहे खास

मुंबई
Updated Oct 15, 2019 | 10:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vidhansabha Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आपला जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध करण्यात आलं आहे. जाणून घ्या या संकल्पपत्रात कुठल्या घोषणांचा समावेश करण्यात आला आहे.

bjp sankalpatra manifesto released vidhansabha election 2019
विधानसभा निवडणूक: भाजपचं संकल्पपत्र प्रसिद्ध   |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं संकल्पपत्र
 • मुंबईतील रंगशारदा सभागृहात संकल्पपत्र प्रसिद्ध
 • भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध केला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत हे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला आहे. जाणून घ्या या संकल्पपत्रात भारतीय जनता पक्षाने कुठल्या घोषणा केल्या आहेत. 

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे 

 1. कोकणातील बंदरे रेल्वे आणि महामार्गाने महाराष्ट्राला जोडणार, मुंबई उपनगरात जलवाहतूक सेवा सुरु होणार, मुंबई-सिंधुदुर्ग जलमार्ग सुरु होणार 
 2. राज्यातील ८ शहरांत नवीन विमानतळ सुरु होणार, शेतीमाल निर्यातीसाठी विमानसेवा विकसित होणार 
 3. प्रमुख शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणार, पोलीस खात्याचे काम अधिक प्रभावी करणार 
 4. धनगर समाजाला १०० कोटींचं विशेष पॅकेज, अनुसूचित जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर मिळणार, अनुसूचित जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा 
 5. राज्यात विविध शहरांत ५ आयटी पार्क, राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नोलॉजी पार्क उभारणार, कंत्राटी कामगारांसाठी लवादा बनणार 
 6. पाचवीपासून शेतीवर आधारीत अभ्यासक्रम, राज्यात नव्या IIT, IIM, AIIMS संस्था उभारणार, औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारणार 
 7. शेतकऱ्यांना वीज पूरवठ्यासाठी १००० मेगावॅटचे पवनऊर्जा प्रकल्प, १५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती 
 8. संकल्पपत्रात भविष्यातील महाराष्ट्र, आमचा संकल्पपत्र हा खूपच वास्तववादी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 9. फुले, सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा संकल्पपत्रात समावेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 10. प्रत्येक जिल्ह्यात अटल विज्ञान केंद्राची स्थापन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 11. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 12. राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नोलॉजी पार्कची निर्मिती करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 13. राज्यातील सर्व माजी सैनिक, शहीद जवानांचे पूर्नवसन होण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 14. राज्यातील ९० टक्के जनतेसाठी मोफत वैद्यकीय उपचाराचा संकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 15. शहरांसोबतच ग्रामीण भागातीलही रस्ते सुधारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 16. राज्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेट, ब्रॉडबँडने जोण्याचा संकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 17. महाराष्ट्र इंटरनेटने जोडण्याचा संकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 18. पुढील पाच वर्षांत एक कोटी रोजगार देण्याचा संकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 19. शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सौरउर्जेचा वापर करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 20. संकल्पपत्रात रोजगार निर्मितीवर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 21. शेतीसाठी सौरउर्जेवर वीज उपलब्ध करुन देणार - जे. पी. नड्डा
 22. वयाच्या ३०व्या वर्षी वैद्यकीय चाचणी बंधनकारक - जे. पी. नड्डा
 23. रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणार - जे. पी. नड्डा
 24. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणार - जे. पी. नड्डा
 25. कोकणातील पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा संकल्प - जे. पी. नड्डा
 26. येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती करणार - जे. पी. नड्डा
 27. महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळणार - जे. पी. नड्डा  
 28. खूपच अभ्यासपूर्ण आण वास्तववादी संकल्पपत्र - जे. पी. नड्डा
 29. भाजपने सर्वच विषयांचा अभ्यास करुन संकल्पपत्र तयार केलं आहे - जे. पी. नड्डा
 30. महाराष्ट्र आता भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शित राज्य आहे - जे. पी. नड्डा 
 31. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला - जे. पी. नड्डा
 32. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वात महाराष्ट्रात अनेक बदल घडले आहेत - जे. पी. नड्डा
 33. ट्रिलियन डॉलरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 34. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ध्येय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 35. नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 36. दुष्काळी भागात पाणी पोहचणार आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 37. पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, दुष्काळमुक्तीवर संकल्पपत्रात भर दिला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 38. महाराष्ट्राच्या प्रचंड विकासासाठी आम्ही संकल्पपत्रातून संकल्प केला आहे - चंद्रकांत पाटील
 39. शिवस्मारक, बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक पूर्ण करणार - चंद्रकांत पाटील 
 40. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार - चंद्रकांत पाटील
 41. भाजप कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संकल्पपत्र प्रसिद्ध
 42. भाजपचा जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध
 43. भाजपने प्रसिद्ध केलेल्या प्रचार गीतात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांचाही उल्लेख
 44. भाजपतर्फे निवडणुकीसाठी नवं प्रचारगीत लॉन्च
 45. जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीनामा प्रसिद्द करत असतो. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर शिवसेनेने आपला वचननामा प्रसिद्ध केला. आता निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहीले असताना भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी