भाजप प्रवक्ता त्रिवेदी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबकडे पाचवेळा मागितलीय माफी

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 20, 2022 | 09:58 IST

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Controversial statement about Shivaji Maharaj by BJP spokesperson Trivedi
भाजप प्रवक्त्याकडून शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रामध्ये सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे.
  • राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्रिवेदींवर जोरदार टीका केलीय.

मुंबई :  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर  सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातील राजकारण तापलं. सावरकरांना मानणारे भाजप नेते जोरदार राहुल गांधींवर टीका करत आहेत. या टीके करताना भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचाही अपमान केला आहे. (BJP spokesperson Trivedi says, Chhatrapati Shivaji Maharaj has apologized to Aurangzeb 5  five times)

अधिक वाचा  : पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? मोठ्या टिप्स

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चुकचे वक्तव्य केलं यावरून टीव्ही वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (BJP Sudhanshu Trivedi) यांनी सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आता विधानामुळे भाजपवर टीका केली जात आहे. 

अधिक वाचा  : मनुक्याचे पाणी मिळवू देऊ शकते या 4 आजारांपासून मुक्ती

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या विरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराजांवर भाजपकडून असे वक्तव्य करणारा ठार वेडाच असू शकतो.

नेमकं प्रकरण काय?

एका खासगी वृत्तवाहिनीने राहुल गांधींच्या सावरकरांच्या वक्तव्यावर वादविवाद आयोजित केला होता. या चर्चेत भाजपचे प्रवक्ते म्हणून सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रेही लिहिली होती. या विधानानंतर राहुल गांधींना घेरण्याऐवजी भाजपवर रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. त्या भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले आहे. 

अधिक वाचा  :अदानींचा अंदाज, 2050पर्यत देशाची अर्थव्यवस्था जगात दुसरी

सावरकरांच्या माफीनाम्याचं प्रकरण ताजं असताना सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्तविधान केले, यामुळे आता भाजप टीकेचा धनी बनत आहे. वाद-विवादाच्या कार्यक्रमात सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याने आता नवीन एक वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमात त्रिवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्रिवेदी म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असायचे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान,आतापर्यंत राहुल गांधींवर खडेबोल बोलणाऱ्या भाजप नेत्यांना खाली मान खाली घालावी लागणार आहे.  शिवाजी महाराज हे  आमचे आदर्श मानणारे भाजप नेते यांच्या मनात वेगळं असतं आणि दाखवतात वेगळं असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. 

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी