Chandrashekhar Bawankule :संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्यावर इतर कैद्यांचा प्रभाव  - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे षंढ आणि नामर्द आहे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर राऊत हे तुरुंगात होते त्यामुळे त्यांच्यावर इतर कैद्यांचा प्रभाव पडला असेल अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकारला नामर्द म्हणणे चुकीचे आहे. संजय राऊत यांना अशी भाषा शोभत नाही.

थोडं पण कामाचं
  • सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे षंढ आणि नामर्द आहे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती.
  • त्यावर राऊत हे तुरुंगात होते त्यामुळे त्यांच्यावर इतर कैद्यांचा प्रभाव पडला असेल
  • अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule : मुंबई : सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे षंढ आणि नामर्द आहे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर राऊत हे तुरुंगात होते त्यामुळे त्यांच्यावर इतर कैद्यांचा प्रभाव पडला असेल अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकारला नामर्द म्हणणे चुकीचे आहे. संजय राऊत यांना अशी भाषा शोभत नाही. महाराष्ट्रातील सरकार चालवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. परंतु राऊत हे तुरुंगातून परतले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर इतरांचा प्रभाव असेल असे बावनकुळे म्हणाले.  (bjp state president chandrashekhar bawankule criticized sanjay raut over maharashtra kanrataka border dispute issue)
बावनकुळे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. गेली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मग त्यांनी सीमाप्रश्नासाठी काय केले असा सवाल बावनकुळे यांनी विचारला. सीमाभागात तणाव निर्माण करून आणि हिंसा करून हे प्रश्न सुटणार नाही तसेच त्यांनी दगड मारला आणि आपण वीट मारली पाहिजे असे करणे चुकीचे आहे असेही बावनकुळे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी