Uddhav Thackeray Interview : मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा (Resign) द्यावा लागला. भाजपला (BJP) शिवसेना संपवायची आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री (Ex CM) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख (Shivsena Chief) उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भाजप फक्त राजकरणासाठी (Politics) हिंदुत्वाचा (Hindutva) वापर करत आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. भाजपने शिवसेना फोडली कारण भाजपला शिवसेना संपवायची आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच याच बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व मजबूत व्हावे म्हणून हिंदुत्वासाठी राजकारण केले, परंतु आता भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर होत आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपकडून शिवसेनेचे हिंदुत्व संपले अशी आवई उठवण्यात आली. असा कुठला निर्णय आणि हिंदुत्वाविरोधात घेतला? मुख्यमंत्री असताना मी दोन वेळा अयोध्येत गेलो. अयोध्येत महाराष्ट्र भवनचे बांधले जाणार आहे. नवी मुंबईत तिरुपती देवस्थानसाठी जमीन देण्यात आली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांना शिवसेने सारख्या पक्षाने राजकारणात जन्म दिला त्याच आई समान शिवसेनेला गिळायला निघाले आहेत. पण तेवढी ताकद त्यांच्यात नाही अशी उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
भाजपकडून विरोधी पक्षांसह मित्रपक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षाला शत्रू समजू नका. विरोधी पक्षानेही जबाबदारीने वागले पाहिजे, सत्ताधार्यांनीही जबाबदारीने वागले पाहिजे असे ठाकरे म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाला आव्हान नव्हे तर आवाहन केले. जर आमचे काही चुकले असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या. हे काम विरोधी पक्षाचे असून ते ही लोकप्रतिनिधी आहेत. सशक्त लोकशाहीसाठी सक्षम आणि सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा. त्याहीपेक्षा सत्ताधारी पक्ष संवेदनशील असला पाहिजे. ही संवेशनशीलता आणि सुसंस्कृतपणा रसातळाला जाताना दिसत आहे. जनता ही सार्वभौम आहे आणि एखादा निर्णय जनतेच्या विरोधात गेला तर जनता रस्त्यावर उतरते असेही ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
अधिक वाचा : MNS: उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.