भाजप जशास तसं उत्तर देणार; किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 24, 2022 | 07:32 IST

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरू असून लोकशाही पायाखाली घातली जात आहे. याला भाजप जशास तसं उत्तर देणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज रविवारी आपण गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis's reaction after the attack on Kirit Somaiya
भाजप जशास तसं उत्तर देणार- देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती.
  • रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही, तरीही नवनीत राणा यांना तुरुंगात ठेवण्यात आले.
  • फडणवीस यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहसचिवानां भेटणार आहेत.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते (Opposition Leader ) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरू असून लोकशाही पायाखाली घातली जात आहे. याला भाजप जशास तसं उत्तर देणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज रविवारी आपण गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

नवनीत राणा, रवी राणा हे मुंबईत दाखल झाल्यापासून मुंबईतील वातावरण तापलं होतं. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असलेल्या दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी खार पोलीस स्टेशन गाठलं. परंतु बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर भाजप आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.  फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुडंगिरी चालली आहे.

मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायाखाली घातली जात आहे. "रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पण त्याचे उल्लंघन करुन नवनीत राणा यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं गेलं. या संबंधी आपण उद्या राज्याच्या गृहसचिवांची भेट घेणार आहोत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारख्या वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी आपण करणार आहोत."
पुढे बोलताना फडणवीस तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे तात्काळ बंद नाही झालं तर आम्ही आक्रमक भूमिका घेणार. एका महिलेला हे सरकार घाबरलं आणि आख्खी मुंबई वेठीस धरण्याचं काम राज्य सरकारनं केलं. जे यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम करत आहेत त्यांना हे जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत."

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. राणा दाम्पत्याची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. दरम्यान, किरीट सोमय्या हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी