BJP will not be able to afford alliance with MNS says Ramdas Athavale : रिपाईंचा आठवले गट (Republican Party of India - Athawale / RPI-Athawale) भारतीय जनता पार्टीसोबत आहे. पण मनसे सोबत येणार की नाही हा प्रश्न आहे. राष्ट्रीय पातळीवर मनसेसोबतची युती भाजपला परवडणार नाही असे परखड मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. भाजप आणि मनसे यांची युती होईल यात कुठलेही तथ्य नाही, असेही आठवले म्हणाले.
भोंग्याच्या राजकारणाशी मी सहमत नाही. मशिदींवरील भोंगे काढण्याला माझा विरोध आहे. मंदिरांवर भोंगे अर्थात लाउडस्पीकर लावण्याला माझा विरोध नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. मशिदींवरचे भोंगे काढणे हे कायद्याला धरून नाही, असेही आठवले म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढा अशी मागणी करुन ३ मे २०२२ पर्यंतचे अल्टिमेटम दिला होता. भाजपनेही मनसेच्या मागणीचे स्वागत केले होते. तसेच राज्यात लाउडस्पीकर बाबतच्या कायदा आणि नियमांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही भाजपने केली होती. यामुळे भोंग्यावरून महाराष्ट्रातले राजकारण तापले आहे. या वातावरणात १ मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबाद शहरात जाहीर सभा घेणार आहेत. ही सभा होण्याआधीच रामदास आठवले यांचे मनसे-भाजप युतीवर मत व्यक्त केले आहे. आपण भाजपसोबत असताना मनसेची गरज नाही या भूमिकेचाही रामदास आठवलेंनी पुनरुच्चार केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.