Ramdas Athawale : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला हरवणे येरा गबाळाचे काम नाही, प्रकाश आंबेडकरांशिवाय आरपीआय ऐक्य शक्य नाही, रामदास आठवले यांचे मत

Ramdas Athawale up election उत्तर प्रदेशात भाजप मधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल अस अजिबात नाही उलट  जे भाजप सोडून जात आहेत  त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही . भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्य़ाचे काम नाही असा टोला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे.

थोडं पण कामाचं
  •  जे भाजप सोडून जात आहेत  त्यांचेच नुकसान होईल
  • भाजप 300 जागा जिंकणार
  • नावात राष्ट्रवादी असले तरी पक्ष राष्ट्रीय होत नाही 

Ramdas Athawale : मुंबई : उत्तर प्रदेशात भाजप मधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल अस अजिबात नाही उलट  जे भाजप सोडून जात आहेत  त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही . भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्य़ाचे काम नाही असा टोला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कल्याणन जवळील गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रविंद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.

प्रकाश आंबडेकरांशिवाय रिपाई ऐक्य शक्य नाही

काही दिवसापूर्वी रिपाई नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आले होते. प्रकाश आंबडेकर यांना सोडून ऐक्य करीत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी जोगेंद्र कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. ऐक्याची भूमिका चांगली आहे. ऐक्य व्हावे या मागणीला पाठिंबा आहे. प्रकाश आंबडेकर यांच्याशिवाय ऐक्य व्हावे या मागणीशी मी सहमत नाही. त्यांना डावलून ऐक्य करण्यात अर्थ नाही असे आठवले म्हणाले.  प्रकाश आंबेडकराना आरपीआय ऐक्याचा अध्यक्ष केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची माझी तयारी आहे, वंचित बहुजन आघाडीने चांगली मतं घेतली ,मात्र मत खाण्याच्या राजकारणामुळे समाजाचा फायदा होणार नाही, त्यासाठी निवडून येऊन सत्ता मिळवणं आवश्यक आहे असेही आठवले म्हणाले. मतं खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला माझा विरोध आहे, मतं खाण्याच्या राजकारणापेक्षा मत घेऊन निवडुन येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करणं आवश्यक असल्याचा सल्लाही आठवले यांनी दिला. 

 

नावात राष्ट्रवादी असले तरी पक्ष राष्ट्रीय होत नाही 

नावात राष्ट्रवादी असले तरी पक्ष राष्ट्रीय होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याला देशात मान्यता नाही. ही पार्टी महाराष्ट्रापुरती आहे. देशातील काही राज्यात पवार साहेबांचे संघटन आहे. मोठ्या आहे. तो राष्ट्रीय पक्ष होत नाही या भाजपच्या मताशी मी सहमत आहे असेही आठवले यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी